आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी नीरा यादव यांची शिक्षा घटवली, हायकोर्टाने दिली हाेती 3 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा - नोएडा प्लॉट वाटप घोटाळ्यात दोषी ठरलेल्या माजी आयएएस अधिकारी नीरा यादव यांच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा एक वर्षाने घटवली आहे.
 
 बुधवारी दिलेल्या निर्णयात त्यांना ३ वर्षे तुरुंगवासाऐवजी आता दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना ३ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता.    
 
गाझियाबादमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने प्लॉट वाटप घोटाळ्यात नीरा यादव यांना नोव्हेंबर २०१२ मध्ये ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 
 
नीरा यादव या १९९४ मध्ये नोएडा प्राधिकरणाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत मागील तारखांमध्ये प्लॉट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. 
 
त्यासंबंधीचा धनादेशही मागच्याच तारखेत जमा दाखवला. त्यानंतर नोएडा सेक्टर - ४४ मध्ये प्लॉट मिळाल्यानंतर तो सेक्टर - १४ ए मध्ये बदलून घेतला. त्याचबरोबर त्याला कॉर्नरचा प्लॉट करण्यासाठी रस्त्याचा आराखडाही बदलून घेतला.    
 
न्यायालयाच्या या निर्णयानंतर या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली असून नोएडा 
सेक्टरमध्ये प्लॉट वाटप घोटाळयाचे प्रकरण चर्चेत आले आहे. 
 
मुलींच्या नावे वाटप केली दुकाने    
याशिवाय नीरा यादव यांनी अल्पवयीन मुलगी संस्कृती आणि सुरुची यांच्या नावे दुकानांचे वाटप केले.  त्या दुकाने चालवत असल्याचे दाखवून नियमाचे उल्लंघन करत प्लॉटही दिले.त्या वेळी संस्कृती अमेरिकेत तर सुरुची दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. नोएडा प्राधिकरणाच्या नियमानुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीला प्लॉट घेता येताे.
बातम्या आणखी आहेत...