आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेश : गाडीत बसलेल्या युवक काँग्रेस नेत्यावर फरशी कुऱ्हाडीने वार, एक जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
अंबाह (मुरैना) - मध्य प्रदेशातील मुरैनाजवळील अंबाह येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या जनरल स्टोअर्समधून एका युवक काँग्रेसच्या नेत्याने मोबाइल रिचार्ज करण्याची मागणी केली. तेथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या  गुंडांनी त्यांना धमकावले.
 
त्या नेत्याने विरोध करताच सहकाऱ्यांना बोलावून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत फरशी कुऱ्हाडीने वार केले. तसेच गोळ्यांच्या फैरी झाडल्या. या हल्ल्यात अंबाहचे युवक काँग्रेसचे नेते व नगरसेवक रघुराज गुर्जर (३८) जखमी झाले, तर त्यांच्या राजवीर गुर्जर या चुलतभावाची  गोळी घालून हत्या करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...