आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा : सावत्र आई साधनाने स्वतःच्या मुलासाठी केली अखिलेशच्या वनवासाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजवादी पार्टीमधील कौटुंबीक वादाचा गुंता अधिकाधिक वाढत असल्याचे दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक नवा पैलू समोर आला आहे. अखिलेश यांच्या सावत्र आईने तिच्या मुलासाठी सिंहासन आणि विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे सीएम अखिलेश यांनी काकाला दूर ठेवत सत्ता उपभोगायची आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणांमागे अमरसिंह यांची मुख्य भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.

मुलायम यांची दुसरी पत्नी नाराज..
- मुलायम सिंह यांची दुसरी पत्नी साधना तिचा मुलगा प्रतिकला राजकी. खुर्चीपासून दूर ठेवल्याने नाराज असल्याची माहिती आहे.
- यावेळी निवडणुकांमध्ये प्रतिकला केंद्रस्थानी ठेवावे अशी त्यांची मागणी आहे.
- यात काही अडचण असेल तर शिवपाल यादवला मुख्यमंत्री करून प्रतिकला त्यांच्याबरोबर कामची संधी द्यावी अशी मागणी आहे.
- शिवपालदेखिल यावर सहमत आहेत.
- दुसरीकडे या सर्वामुळे आपण सत्तेपासून दूर जाणार असल्याची जाणीव रामगोपाल यादव यांना आहे.

अमरसिंह समर्थक म्हणाले, विनाकाराण वादात ओढले जातेय
- या प्रकरणी अमरसिंह यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या महरोली येथील घरी संपर्क केला त्यावेळी ते मुंबईत असल्याची माहिती मिळाली.
- मोबाइलवरही अमिरसिंह बोलले नाही. त्यांच्या घरी असलेले समर्थक म्हणाले, या प्रकरणाशी त्यांचां काहीही संबंथ नसून त्यांना विनाकारण या सर्वामध्ये ओढले जात आहे.
पुढे वाचा, काय आहे संपूर्ण वाद.. कसे आहे राजकारण.. अखेरच्या स्लाइडवर पाहा यादव कुटुंबाचा फॅमिली ट्री..
बातम्या आणखी आहेत...