आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखोईने ९७ फैरी झाडून पाकचा हेरगिरी करणारा बलून पाडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर / बाडमेर- प्रजासत्ताकदिनी मंगळवारी पाकिस्तानहून उडत आलेला हेरगिरी करणारा बलून भारतीय लढाऊ विमान सुखोई ३० एमकेआयद्वारे गोळ्या झाडून हवेत नष्ट केला. सीमा क्षेत्र शिवमध्ये ८ किमी उंचीवर उडणारा दहा फूट बलून सुखोईने ९७ फैरी झाडून पाडला. फुग्यावर "हॅपी बर्थ डे' लिहिले होते. फुगा फुटल्यानंतर पाली जिल्ह्यातील गुंदोज गावात शेतात तो कोसळला. जोधपूरहून गेलेल्या दोन एमआय १७ हेलिकॉप्टर्सनी या फुग्याचे अवशेष जप्त केले. गुप्तचर सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार हे बलून सोडून पाक भारताच्या प्रतिसादाचा अंदाज घेत होता. परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा पाकिस्तानसमक्ष उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की, एक चमकणारी वस्तू दिली होती. १५ मिनिटांच्या आत सुखोईने ३० एमएम कॅनन गनमधून मारा करून ती वस्तू पाडली. दिल्लीच्या हवाईदल मुख्यालयाचे संरक्षण प्रवक्ते विंग कमांडर रौशेल डिसिल्वा यांनी बुधवारी सांगितले की, विमानतळावरील रडारमध्ये जैसलमेर भागात १० फूट लांबीचे बलून उडत असल्याचे दृश्य टिपले. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र हायअलर्ट होता. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घेत फायटर जेट सुखोईने हे बलून पाडून टाकले. बलूनमध्ये कोणत्याही प्रकारची घातक सामग्री नव्हती.