आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ वर्षांपासून पित्याला पाहिले नाही, मुलगी पाकला कशी जाणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर - ८२ वर्षीय वडील पाकीस्तानात शेवटचा श्वास मोजत आहेत. मुलगी त्यांच्याशी एका मुलाखतीची संधी मिळवू इच्छिते आहे त्यासाठी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. इकडे वेळ वेगाने पळतो आहे. दोन महीने झाले आहेत वडीलांच्या आजारपणाची बातमी मिळून. तेव्हापासून बसीरा माई (वय ४५) एनओसी मिळविण्यासाठी कार्यालयांमधून फिरते आहे. इकडे, प्रशासनाने बसीराचा तो पाकीस्तानी पासपोर्टच हरवून टाकला आहे. जो एनओसी मिळण्यासाठीचा आधार आहे. पाकीस्तानचे रहीमयारखान मध्ये जन्मलेली बसीरा माई २४ वर्षापूर्वी म्हणजे १९९२ मध्ये भारतात आली होती.

श्रीगंगानगरात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पिता लक्ष्मण राम यांनी इथेच तिचा विवाह जवळील कालियां गावातील गोमंदराम याच्याशी लावून दिला होता. तो तिने वडीलांना पाहीलेला शेवटचा दिवस होता. त्यांनंतर तिचे पाकिस्तानातील आपले गाव पीहरला जाणे झालेच नाही. १८ फेब्रुवारी २००५ रोजी बसीरा माई हिला भारतीय नागरिकत्वही मिळाले. दोन महीन्यापूर्वी तिचा भाऊ रावतराम याचा फोन आला. बातमी होती की वडील खुप आजारी आहेत. शेवटच्या वेळी तरी तुला भेटू इच्छितात. बसीरानेही पाकीस्तानात जाण्याची तयारी सुरु केली.

व्हीसासाठी तिने पतिसह पाकिस्तानी दूतावासात अर्जही केला. पण त्याची तयारी तिथेच थांबली आहे. पाकीस्तानने तिला ना हरकत मागितली. इकडे मात्र बसीराला भारतीय नागरिकत्व मिळाले होते. त्यामुळे तिचा पाकिस्तानी पासपोर्ट प्रशासनाने जमा करुन घेतला होता. आता कलेक्ट्रेट मध्ये बसीराचे रेकॉर्डच मिळत नाहीये. बसीरास सरकारी नियम माहीत नाहीत. तिचे दु:ख तर इतकेच आहे की, तीला वडील भेटू इच्छिताहेत, पण इच्छा असूनही ती त्यांना आता भेटू शकत नाहीये. इच्छा असूनही ती त्यांच्यापर्यंत पाकला पोहोचू शकत नाहीये. ती म्हणते आहे की, मी ऐकले होते सरकारात कोणी सुषमा स्वराज आहेत. त्या दोन्ही देशातील लोकांसाठी काम करतात. कुणीतरी माझे दु:ख त्यांच्यापर्यंत पोहोचवा तेव्हा तरी मी माझ्या वडीलांना पाकमध्ये जाऊन भेटू शकेल. बसीरा आता पतीसह कलेक्ट्रेटमधील खोल्यांमध्ये चकरा मारतेच आहे. येथील खुर्च्यांमधील प्रत्येक माणूस तीला अधिकारीच वाटतो. प्रत्येक ठिकाणी ती आपल्या मागणीची भीक मागते आहे पण कोणीही तिला हेच उत्तर देतो आहे की- तुमचे रेकॉर्ड शोधत आहोत. याविषयी भास्करने जेव्हा विचारले तेव्हा एडीएम कर्तार सिंह पूनियांशी बोलले तेव्हा ते म्हणाले- मी या प्रकरणाची माहिती घेऊन शक्य होईल तेव्हढी मदतच करेल.
बातम्या आणखी आहेत...