आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदापूरची बातच न्यारी, गावात 600 घरजावई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पानिपत  - हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सौदापूर हे गाव घरजावयांचे गाव म्हणून लोकप्रिय होत आहे. या गावातील प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या कुटुंबात घरजावई असून आता तर जावयांचेही जावई झाले आहेत.
 
१२.५ हजार लोकसंख्येच्या या गावात फक्त ७.५ हजारच स्थानिक नागरिक आहेत.  ६०० पेक्षा अधिक जावई सध्या या गावातच स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे, सौदापूरचे सरपंच राजेश सैनी यांचे वडील जय भगवान हेसुद्धा या गावचे जावईच आहेत. येथील देवाना आणि सुलतान यांच्या मते, सौदापूरच्या मुलींचे बाहेरगावच्या वरासोबत लग्न लावून दिले जाते. मात्र, काही अडचणी आल्यास त्या पतीसोबत मूळ गावी परत येऊन जातात. तिच्या माहेरकडील मंडळी मग मुलीसोबतच जावयालाही रोजगार मिळवून देतात. त्यामुळे ते नंतर येथेच स्थायिक होतात.  
सरपंच सैनी यांच्या मते, आमच्या गावातील रोजगाराच्या संधींमुळेच जावयांची संख्या वाढली आहे. सौदापूरपासून पानिपत शहर जवळच आहे. त्यामुळे लोक या ठिकाणी राहण्यास प्राधान्य देतात. ६६ वर्षीय जय भगवान सांगतात, अनेकदा मुलगी आणि जावई अन्य कारणांमुळेही सौदापूरला येऊन जातात. मी सोनिपतच्या बिचपाडीचा मूळ निवासी आहे.
 
सुमारे ४० वर्षांपूर्वी लग्नानंतर काही वर्षांनी कुटुंबात वाद झाला. त्यामुळे मी आणि माझ्या पत्नीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही जसया गावात रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही रेल्वे आलीच नाही. बाजूच्याच स्टेशनजवळ त्या रेल्वेचा अपघात झाला होता. पत्नीने एकदा माहेरून काही मदत घेण्याची गोष्ट केली आणि आम्ही सौदापूरला निघून आलो. मोलमजुरी केली. आता स्वत:चे प्लॉट आणि घर तर आहेतच, शिवाय आमचा मुलगाच या गावचा सरपंच आहे. मागील ४० वर्षांपासून आम्ही या गावचेच रहिवासी बनलेलो आहेत.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...