आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत ‘काम नाही, वेतन नाही’चा विचार; एकमतासाठी मंत्र्यांची विरोधकांशी चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी/नवी दिल्ली- संसदेतील कोंडी फुटण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याच्या पार्श्वभूमीवर,‘काम नाही तर वेतन नाही’ हे नोकरशहांना लागू असलेले सूत्र खासदारांसाठीही लागू करण्याची सूचना समोर आल्याची माहिती केंद्रीय पर्यटन, संस्कृतीमंत्री महेश शर्मा यांनी शनिवारी वाराणसी येथे दिली होती. या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाल्याने त्यांनी रविवारी या वक्तव्यावरून घूमजावही केले.

खासदारांनी संसदेचे काम रोखून धरल्यामुळे जनतेचा पैसा वाया जात आहे, त्यामुळे ‘काम नाही तर वेतन नाही’ हे धोरण अवलंबणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शर्मा यांना विचारला होता. त्यावर शर्मा म्हणाले, नोकरशहांप्रमाणेच खासदारांसाठीही ‘काम नाही तर वेतन नाही’ हे सूत्र लागू करण्याची सूचना आली आहे. आमचे ज्येष्ठ मंत्री विरोधी पक्षांच्या संपर्कात आहेत. शिस्तभंग करणाऱ्या खासदारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यापूर्वी त्यावर एकमत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुषमा स्वराज, वसुंधराराजे, शिवराज चौहान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले आहे.

हे सरकारचे मत की मंत्री महेश शर्मा यांचे : विरोधी पक्षांचा प्रश्न
शर्मा यांच्या वक्तव्यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. ‘हा दृष्टिकोन शर्मा यांचा आहे की सरकारचा,’ अशी विचारणा विरोधी पक्षांनी केली. त्यामुळे रविवारी शर्मा यांच्या बोलण्याचा सूर नरमला. ते म्हणाले,‘मी नेमके काय बोललो ते पाहावे लागेल. निश्चितपणे ते माझे वक्तव्य नाही. मी अधिकृत व्यक्ती नाही. लोकसभेच्या अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ मंत्री यांच्यात तशी चर्चा होईल, असे मला वाटते.’

आजच्या सर्वपक्षीय बैठकीकडे लक्ष
संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. कोंडी फोडण्यासाठी सरकारने तीन भाजप नेत्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अजेंड्यावर घ्यावा, अशी अट काँग्रेसने घातली आहे. त्यामुळे या बैठकीकडे देशाचे लक्ष आहे.
धुमल पिता-पुत्रावर आता काँग्रेसचे लक्ष्य
हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंहांवर भाजपने केलेल्या आरोपांवरून काँग्रेसने पलटवार केला. ‘हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल, त्यांचे खासदार पुत्र अनुराग ठाकूर यांनी धर्मशालात १६ एकर जमीन क्रिकेट स्टेडियमसाठी मोफत घेतली. त्यामुळे तिजोरीला १०० कोटींचा फटका बसला, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला.

गोंधळ वेदनादायी : सोमनाथ चटर्जी
लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी म्हणाले,‘संसदेत वारंवार होणारा गोंधळ वेदनादायी आहे. आज भाजपकडे बहुमत आहे. विरोधक कमजोर आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाहीची संपूर्ण प्रक्रियाच कमजोर झाली आहे. आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही कशाला चर्चा करू, असा विचार सत्ताधारी पक्ष करतो. त्यामुळेच अध्यादेशांची गरज पडते.
सरकार-विरोधकांत शाब्दिक चकमक सुरूच
‘राजकीय कारणांमुळे काँग्रेस सरकारबाबत निराश असू शकेल. नकारात्मकता आणि अडथळे आणण्याच्या प्रवृत्तीमुळे देशाचे, अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. काँग्रेसने ते स्वीकारावे आणि आत्मपरीक्षण करावे.’
- अरुण जेटली, अर्थमंत्री, ‘फेसबुक पोस्ट’

‘काँग्रेस गोंधळलेली आहे. त्या पक्षाने आत्मपरीक्षण करावे. पक्षाने स्वत:चीच कोंडी करून घेतली आहे. सुषमा स्वराज-ललित मोदी यांच्याशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करून काँग्रेसला सन्मानाने या कोंडीतून बाहेर पडता येईल.’
- निर्मला सीतारामन, भाजप प्रवक्ता.

‘पंतप्रधानांच्या अरेरावी, हट्टी वृत्तीमुळेच संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. संपूर्ण दोष त्यांचाच आहे. जेटली आणि भाजपची वक्तव्ये अयोग्य, प्रक्षोभक आहेत. संसदेतील पेच सोडवण्याबाबत सरकार गंभीर नाही. भाजपने देशभक्ती शिकवू नये.
- आनंद शर्मा, काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या विविध राज्यांतील खासदारांची नो वर्क नो पेबाबतचे मत...