आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा: तोल गमावणाऱ्या तळीरामांवर गोवा पोलिसांची धडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
गोवा- स्वस्थ दारू आणि मद्य प्राशनासाठी मोकळे वातावरण यामुळे गोव्यात पर्यटकांची झुंबड उडते. पण अलिकडे अतिमद्य प्राशन करून सार्वजनिक ठिकाणी पर्यटक आणि स्थानिकांना त्रास देण्याऱ्या तथा दंगामस्ती करणाऱ्या तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी गोवा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.
 
गोव्याच्या पर्यटनाला बदनाम करणाऱ्या या प्रकाराविरोधात धडक कारवाईचे आदेश उत्तर गोवा पोलिस अधिक्षक कार्तिक कश्यप यांनी जारी केले आहेत. गोव्यातील किनारी भागांत रात्री- अपरात्री मद्यप्राशन करून धुडगुस घालण्याचे प्रकार वाढले आहेत. दारूच्या बाटल्या फोडून किनाऱ्यांवर टाकल्या जातात. यामुळे  किनारे अस्वच्छ आणि फिरण्यासाठी धोकादायक बनत आहेत. या अनुषंगानेच ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
 
उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट किनारी भागांत ही कारवाई सुरू झाली आहे. याप्रसंगी अतिमद्य प्राशन केलेल्या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात ते भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ (४) अंतर्गत दोषी आढळून आले. त्यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. अटक केलेल्यामध्ये कोलाल कर्नाटक, सावळगांव, नागपूर, मध्यप्रदेश, आसाम, बेळगांव आदी ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश आहे. ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल, अशी माहिती कार्तिक कश्यप यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...