आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस उमेदवाराचा चालक हातकडीसह पळाला... अन् पोलिस पाहतच राहिले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसा - पंजाबच्या बुढलाडामधून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार बीबी रणजित कौर भट्टी यांचा ड्रायव्हर प्रवेशकुमार हातकडीसह फरार झाला. न्यायालयाने त्याला लुधियानात धनादेश अनादर प्रकरणात फरार घोषित केले होते. लुधियाना पोलिसांनी त्याला मलको या त्याच्या मूळ गावी पकडले होते.
 
मानसाचे सहायक पोलिस अधीक्षक विवेकशील यांनी बोहा ठाण्यास भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. लुधियानातील टॅगोरनगर येथील रहिवासी प्रवेशकुमार हॅपी याच्याविरोधात इंदरसिंग दिवाण यांनी  न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याला ११ जानेवारी २०१७ रोजी त्याच्यावर समन्स बजावले होते. मॉडेल टाऊन पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी जगजितसिंग पथकासह त्याच्या मलको या गावी पोहाेचले. त्याला बेड्या घातल्यानंतर तो पळून गेला. पोलिस कर्मचारी आणि काँग्रेसच्या उमेदवार हा प्रकार पाहतच राहिले. काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड केली. नंतर तो पळून जात असताना सर्वांनी एकच गलका केला.