आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, 1 गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वडोदरा (गुजरात) - गुजरातेतील वडोदरा येथे पारूल विद्यापीठात भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांत जोरदार हाणामाऱ्या झाल्या. या मारहाणीत दोन विद्यार्थी जखमी झाले. एका भारतीय विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. हा वाद रविवारी रात्रीपासून एका किरकोळ प्रकरणातून उद्भवला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत अफगाणिस्तान, कॅमरून, कांगो आणि झांबियासह चार देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी संबंधित देशातील दूतावासांना माहिती देण्यात आली आहे.  

सोमवारी विद्यापीठाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू झाले. पण वातावरणात तणाव होता.  अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार देशांतील १० विद्यार्थ्यांसह ६० परदेशी विद्यार्थ्यांच्या  तसेच ५५ भारतीय विद्यार्थ्यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्या. पारूल विद्यापीठात ४५० परदेशी विद्यार्थी आहेत. पारूल विद्यापीठाचे संस्थापक डॉ. जयेश पटेल यांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. त्यामुळे या विद्यापीठाचे नाव चर्चेत आले. त्यांना अटक करण्यात आली.