आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रद्युम्न मर्डर: हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी छळ केला; वाहक अशोकचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव- प्रद्युम्न हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी केलेला बसचा वाहक अशोक बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता जामिनावर सुटला. घामडौज या त्याच्या गावी पोहोचल्यानंतर अशोकने सांगितले, आरोपी करण्यासाठी पोलिसांनी खूप छळ केला. मला विजेचे शॉक देण्यात आले. जेवण देण्यात येत नव्हते. त्यांच्या छळाला कंटाळून बेशुद्धावस्थेत मी हत्येचा गुन्हा कबूल केला. प्रद्युम्नचे पिता वरुण यांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यामुळे सर्व सत्य बाहेर आले. तसे झाले नसते तर मला जामीन मिळाला नसता. मंगळवारी अशोक यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रजनी यादव यांनी त्याची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केेली. 


विश्वस्तांना अग्रिम जामीन
प्रद्युम्न हत्याकांडप्रकरणी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने मंगळवारी रेयान इंटरनॅशनल ग्रुपचे संस्थापक चेअरमन ऑगस्टिन पिंटो, कार्यकारी संचालक ग्रेस पिंटो व सीईओ रेयान पिंटो यांना अग्रिम जामीन मंजूर केला. आरोपींनी सीबीआयला तपासकामात सहकार्य करावे. 

 

फिंगर प्रिंटची सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी
प्रद्युुम्न हत्याकांड प्रकरणातील आरोपी, ११ वीच्या विद्यार्थ्यास सीबीआयने बुधवारी विकास सदन येथील जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर दुपारी सव्वाबारा वाजता हजर करण्यात आले. बोर्डाने आरोपी किशोर यास १४ दिवसांसाठी फरिदाबादच्या बालसुधारगृहात पाठवले आहे. आता आरोपीला ६ डिसेंबर रोजी बोर्डासमोर हजर करण्यात येईल. पीडित वरुण ठाकूर यांचे वकील सुशील टेकरीवाल यांनी आरोपी विद्यार्थ्याला त्याचे पालक बालसुधारगृहात ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ भेटतात यावर बोर्डासमोर आक्षेप घेतला.  सोमवारी आरोपी विद्यार्थ्याचे पालक त्याच्यासोबत  ५ तास होते. मात्र, बालसुधारगृहाच्या नियमावलीनुसार आठवड्यात मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस फक्त १० ते १५ मिनिटे भेटता येते, असे त्यांनी सांगितले.   


टेकरीवाल म्हणाले, आरोपीचे पालक त्याला काही गोष्टी समजावून सांगत आहेत हे आक्षेपार्ह आहे. दुसरी बाब अशी की, बाेर्डासमोर सीबीआयने आरोपी विद्यार्थ्याच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याच प्रकारे आरोपी विद्यार्थ्याच्या पालकाने सीबीआयने आरोपीला जास्त काळ ताब्यात घेतले होते यावर आक्षेप घेतला आहे. या तिन्ही प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार अाहे. 

  
वयस्काप्रमाणे खटल्यावर ५ डिसेंबरला निर्णय   
सुशील टेकरीवाल यांनी सांगितले, आरोपी विद्यार्थ्याचे वय १६ वर्षाहून जास्त आहे. त्याला वयस्काप्रमाणे वागणूक दिली जावी. या प्रकरणाची सुनावणी बोर्डासमक्ष ५ डिसेंबरला होईल. यानंतर आरोपीवर जेजे कोर्टात खटला चालणार की जिल्हा न्यायालयात चालणार याचा निर्णय होईल.

बातम्या आणखी आहेत...