आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवतींना चार महिने आधी पाठवतात माहेरी, दामोदरपुरा गाव जंगलात वसलेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेटा (राजस्थान)- काेटा शहरापासून ६५ किमी अंतरावरील दामाेदरपुरा या जंगलात वसलेल्या गावात रुग्णालय, रस्ते, वीज यांसारख्या सुविधाच  नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला गर्भवती महिलांना प्रसूतीच्या चार महिने अगाेदर तिच्या माहेरी किंवा इतर ठिकाणी पाठवून देतात. गर्भवती महिला व जन्माला येणाऱ्या बाळाला काेणताही धाेका पाेहाेचू नये, हा उद्देश आहे.

अरावली पर्वतरांगेत वसलेल्या या गावात सुमारे १०० घरे असून, लाेकसंख्या ४०० च्या अासपास अाहे. या गावातील गर्भवती महिलांना व इतर रुग्णांना वैद्यकीय तपासणीसाठीदेखील जंगलमार्गे ६५ किमी अंतरावरील काेटा शहरात जावे लागते किंवा ५०० मीटर उंच डांेगराचा तीन किलाेमीटर रस्ता कापून ४५ किलाेमीटरवरील रामगंजमंडी येथील रुग्णालयात जावे लागते. ग्रामस्थांनी सांगितले की,२००६ मध्ये ९ महिन्यांची गर्भवती महिला कैलाशीबाईला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. गावात सुविधा नसल्याने तिला एका खाटेवर झाेपवून डाेंगराच्या रस्त्यावरून नेले जात असतानाच तिचा मृत्यू झाला. त्या घटनेपासून अाम्ही याबाबत काेणताही धाेका पत्करत नाहीत. त्यामुळे अाम्ही घरातील गर्भवती महिलेला प्रसूतीच्या चार महिने अगाेदर तिच्या माहेरी किंवा इतर ठिकाणी पाठवून देताे. 

हे गाव जंगलात वसलेले असल्याने जंगल कायद्यानुसार गावात रस्ते, वीज, चिकित्सा अादी सुविधा नाहीत. तसेच अाम्हीदेखील सुविधा निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे पत्र्यांचे शेड वा गवताचे छप्पर असलेल्या घरात राहावे लागते. वीज नसल्याने माेबाइल चार्ज करण्यासाठी प्रत्येक वेळी पाच किंवा दहा रुपये द्यावे लागतात. शाळाही बंद झाल्याने मुलांना इतर ठिकाणी जावे लागते. ज्येष्ठ नागरिक चाैथमल सांगतात की, रात्री एखादी व्यक्ती अाजारी पडली, तर तिला खाटेवर वा अन्य साधनाने डाेंगराच्या रस्त्याने रुग्णालयात न्यावे लागते. इतर गावकरी काही अंतरापर्यंत येऊन मदत करतात. डाेंगर चढताना थांबत जावे लागते. ही अामची अॅम्ब्युलन्स अाहे. या कामासाठी गावकरी एकमेकांना प्राधान्याने मदत करतात.
बातम्या आणखी आहेत...