आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लव्हली युनिव्हर्सिटी’ची राष्ट्रपतींना मानद डॉक्टरेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर  - लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) ने आपल्या आठव्या वार्षिक पदवीप्रदान समारंभामध्येे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. या आधीदेखील एलपीयूने जगातील सहा वरिष्ठ नेत्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे. यात अफगाणिस्तान, मॉरिशस, किंगडम ऑफ लिसॉथो, कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिका येथील राष्ट्रपती आणि पंतप्रधान तसेच शांततेचा पुरस्कार मिळालेले धर्म गुरू १४ वे दलाई लामा यांचा समावेश आहे.  

या वेळी राष्ट्रपती मुखर्जी यांनीदेखील एलपीयूच्या विद्यार्थांना त्यांच्या अकादमिक आणि संशोधन दक्षतेसाठी पीएचडी पदवी, ३८ सुवर्ण पदके आणि १६४ पुरस्कारांचे वितरण केले. पंजाबचे राज्यपाल व्ही.पी. सिंह या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. एलपीयू परिसरात ३०,००० लोकांची क्षमता असलेल्या कन्व्हेंशन सेंटर “युनिपोलिस’चा शुभारंभ देखील राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री विजय सांपला, पंजाबचे कॅबिनेट मंत्री राणा गुरजीत सिंह, एलपीयूचे कुलपती अशोक मित्तल, रश्मी मित्तल, प्रो. डॉ. रमेश कंवर यांची उपस्थिती होती.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...