आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबेंविरुद्ध महाभियोगाच्या प्रक्रियेस सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- झिम्बाब्वेमध्ये सैन्य आणि पक्षाच्या दबावानंतरही राजीनामा देण्यास राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे राजी झाले नाहीत. त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सत्तारूढ जानू -पीएफ पक्षाचे प्रवक्ता सायमन खाया मोयो यांनी सांगितले की, पक्षाने संसदीय समितीच्या प्रमुखांना मुगाबेंविरुद्ध अविश्वास  प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश दिले. पक्षाच्या २६० पैकी ३० सदस्यांनी मुगाबे यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी संमती दिली. सरकारला अस्थिर करणे, पत्नी ग्रेसी मुगाबे यांना घटनात्मक अधिकारांमध्ये दखल देण्याची सूट दिल्याचा आरोप मुगाबेंवर आहे. झिम्बाब्वेच्या घटनेनुसार महाभियोग प्रस्तावावर सिनेट आणि नॅशनल असेंब्लीने शिक्कामोर्तब केल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवले जाईल. झिम्बाब्वे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी मुगाबेंविरुद्ध मोर्चा आणि निदर्शने करण्याचे जाहीर केले आहे.  


अटक होण्याच्या भयाने संसद सदस्य परदेशात 
सैन्याने १५ नोव्हेंबर रोजी सत्ता उलथवण्याच्या कारवाईस सुरुवात केली होती. यात अटक होण्याच्या भीतीने बहुतांश संसद सदस्य परदेशी निघून गेले. सत्तारूढ पक्ष जानू -पीएफचे बहुतांश लोकप्रतिनिधी देशाच्या बाहेर आहेत. काही अज्ञातस्थळी आश्रयास आहेत.


लोकभावनांचा आदर राखत मुगाबेंनी राजीनामा देणे योग्य
उपराष्ट्राध्यक्ष पदावरून बडतर्फ केले गेलेले इमर्सन मनांगावा यांनी प्रथमच मुगाबेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनांगावा यांनी म्हटले की, झिम्बाब्वेच्या जनतेने एकमुखाने ही मागणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष मुगाबेंकडे मी अपील करतो की, लोकभावनांचा आदर राखत त्यांनी आता राजीनामा द्यावा. मनांगावा यांनी सांगितले की, मुगाबेंनी समेट करण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला होता. मुगाबेंविरुद्ध निदर्शनांचे नेतृत्व करणारे डगलस गुम्बो यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे.  

बातम्या आणखी आहेत...