आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्येकडील राज्यांसाठी 2,350 कोटींचे पॅकेज ;मोदींकडून आढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - ईशान्येकडील राज्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेला सावरण्यासाठी केंद्राने मदतीचा हात पुढे करताना मंगळवारी २ हजार ३५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली.
 
पंतप्रधान मंगळवारी आसामच्या दौऱ्यावर होते. त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मोदींनी आसामसह अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँडच्या मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली. मिझोरामचे मुख्यमंत्री लाल ठाणावाला बैठकीला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आसामसाठी ३ हजार ८८९ कोटी रुपयांचा आराखडा मांडला होता. नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर. झेलियांग यांनी ७०० कोटींची अपेक्षा व्यक्त केली होती.
बातम्या आणखी आहेत...