आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सोपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा- दत्तक पुत्र घेण्याच्या प्रक्रियेला घेऊन २०११ मध्ये तयार केलेल्या नियमांमध्ये बदल केला. यासाठी नियम २०१५ नव्याने तयार केलाय. केंद्रीय महिला आणि बालविकास विभागाने मूल दत्तक घेण्यासाठी तयार केलेल्या नियमातील कठीणता दूर केली. हा नवा नियम सर्व राज्यांसाठी असेल तशी अधिसूचनादेखील जारी केलीय. आता कोणत्याही निपुत्रिक दांपत्याला मूल दत्तक घेणे सोप होईल. त्यात पारदर्शकत्व ठेवण्यासाठी नव्या नियमाला परिस्थितीनुरूप अनुकूल बनवले गेले आहे. नियम २०१५ मध्ये हे विशेष आहे की, मूल दत्तक घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत आता पूर्वीसारखा खूप वेळ कालावधी लागणार नाही. आयसीडीएसच्या उपसंचालिका निर्मला मईडा यांनी सांगितले की नवे नियम पूर्णपणे लागू झाले आहेत.

अधिक वयाच्या लोकांना दिलासा : आता जे विवाहित दांपत्य, ज्यांचे वय ५५ वर्षे वा त्याहून अधिक आहे व ज्यांना बाळ दत्तक घ्यायचे आहे ते राज्याच्या नोंदणीकृत अथवा मान्यताप्राप्त दत्तक ग्रहण एजन्सीकडून मूल दत्तक घेऊ शकतील. यासाठी सरकारने एक ई-गव्हर्नन्स प्रणाली (पद्धीती) केंद्रीय दत्तक ग्रहण विकास सूचना दिशादर्शक प्रणाली केअरिंग याची सुरुवात केली आहे. जे सर्व जिल्हा शिशू सुरक्षा समितीकडून ऑनलाइन जोडलेली असेल तसेच दत्तक जाणाऱ्या मुलाची जाहिरात देण्यासाठी जबाबदार असेल.

२०११ मध्ये हा होता नियम
-दत्तक घेण्यापूर्वी ६ महिन्यांपर्यंत बाळाच्या देखभालीचे शपथपत्र देणे होत असे
-जिच्याकडून मूल दत्तक घेतले जात होते तिच्याकडून नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र ऊर्फ ती या निर्णयाने समाधानी आहे, असे प्रमाणपत्र तिला द्यावे लागे.
-मूल दत्तक घेणाऱ्यांचे वय आणि बाळाचे वय यात अंतर असणे गरजेचे नव्हते.
-मूल दत्तक घेणारे माता-पिता यांच्या संयुक्त वयाला घेऊन कुठलीही बांधा वा आडकाठी नव्हती.

२०१५ मध्ये नवे नियम
-मुलाच्या देखभालीचे शपथपत्रासह आप्तस्वकीयांच्या साक्षीप्रमाणे ते घ्यावे लागेल.
-आनंदी-समाधानाच्या प्रमाणपत्रासह मुलाचा आरोग्य तपासणी अहवालही जरुरी असेल.
-मूल दत्तक घेणारी जोडपी म्हणजे संभावित माता-पिता आणि दत्तक बाळ यांच्यातील अंतर कमीत कमी २५ वर्षांचे तर असावे.
-दत्तक विधान करणारे माता -पिता याचे संयुक्त वय ११० वर्षांहून अधिक असू नये.