आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्यांचा जीपीएफ, गावातील देणगीतून साकारला पादचारी पूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड/सोलन - हिमाचलच्या सोलनहून सुमारे दोन तासांच्या अंतरावरील भूमती हे गाव. या डोंगराळ भागात ६९ वर्षांपासून एका शाळेची भयावह स्थिती होती. शाळेच्या परिसरातूनच रस्ता होता. त्यामुळे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, खेळ, शौचालयासाठी हमखास रस्ता ओलांडावा लागायचा.
दरम्यान, अनेक बालकांना अपघातांचा सामनाही करावा लागला. मात्र, आता परिस्थिती सुधारली आहे. बालकांसाठी याठिकाणी पादचारी पूल बनवलेे गेले. प्राचार्यांच्या जीपीएफच्या अडीच लाखांतून आणि गावकऱ्यांनी दिलेल्या वर्गणीतून याची उभारणी झाली. पादचारी पुलासाठी गुप्ता यांनी पंचायतीपासून अनेक शासकीय कार्यालयाचे खेटे मारले. बांधकाम विभागाने नियोजनही केले. मात्र, निधीची समस्या उद‌्‌्भवली. तितक्यातच जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. प्राचार्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. हताश होऊन शेवटी गावकऱ्यांनीच वर्गणी जमा केली.

६ मे २०१२ चा दिवस
प्राचार्य भूपिंंदर गुप्ता यांनी सांगितले, माझा कामाचा दुसराच दिवस होता. बाहेर गोंधळ दिसला. एका वाहनाने बालकाला धडक दिली होती. त्याला तत्काळ रुग्णालयात पाठवले. त्यापूर्वी याच ठिकाणी मी वाहतूक कोंडीत अडकलो होतो. मी लगेच पादचारी पूल बनवण्याचा निश्चय केला.
बातम्या आणखी आहेत...