आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वेच्छेने वेश्या व्यवसाय करणारीशी संबंध आल्यास बलात्काराचा गुन्हा नाही’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अहमदाबाद  - वेश्यालयात जाणाऱ्यांना देहविक्रयासाठी बाध्य केल्याप्रकरणी जबाबदार धरता येणार नाही. तसेच स्वेच्छेने  कोणी वेश्या व्यवसायात येत असेल तर त्या महिलेच्या बाबतीत बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.   

न्यायालयाने सुरतच्या विनोद बागुभाई पटेल ऊर्फ विजयच्या विरुद्धचे आरोप फेटाळून लावले आणि पोलिसांना नव्याने तपासाचे आदेश दिले आहेत. त्याचबराेबर असेही म्हटले की, त्यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाल्यास तोही यातून निर्दोष सुटणार नाही. न्यायालयाने आदेशात म्हटले की, जर एखादी महिला स्वेच्छेने  वेश्या व्यवसायात आली असेल तर शारीरिक शोषणाचे कलम ३७० अाणि त्यातील दुरुस्ती तिला लागू पडत नाही. मात्र, माणसाची खरेदी-विक्री गुन्हा आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. 
 
 न्यायालयाने असेही म्हटले की, याचिकाकर्त्यास अनैतिक देहव्यापार (प्रतिबंध) कायद्याखालील गुन्ह्यास दोषी मानता येणार नाही. याचिकाकर्त्याने त्या महिलेस जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले असे म्हणता येणार नाही. कलम ३७० नुसार कोणीही व्यक्ती अन्य कोणास तिच्या मर्जीच्या विरुद्ध आयात, निर्यात करत असेल, विकत घेत असेल किंवा विक्री करत असेल त्यास शिक्षा केली जाईल.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...