आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुतळ्यांना काळे कपडे घालून नोंदवला निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलसाड - काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून सात जणांची हत्या केली होती. मृतांपैकी पाच जण बलसाडचे रहिवासी होते. देशभरात या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे.
 
गुजरातच्या बलसाड येथील व्यापाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने निषेध नोंदवला. तयार कपड्यांच्या व्यापाऱ्यांनी शो-रूमच्या बाहेर ठेवलेल्या पुतळ्यांना काळे ड्रेस घातले. त्यांच्या गळ्यात पाट्या अडकवल्या. त्यावर हल्ल्यात बळी गेलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली. शोक म्हणून त्यांनी दिवसभर उपवासही केला. विश्व हिंदू परिषदेने हल्ल्याचा देशभरात निषेध नोंदवला.
बातम्या आणखी आहेत...