आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी गायकांच्या गाण्यास बंदी, या गायकांची गाणी शासकीय कार्यक्रमांतून गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हंसराज हंस, भाजप - Divya Marathi
हंसराज हंस, भाजप
पंजाबी - गायकांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी. आता त्यांना पंजाबच्या निवडणूक आखाड्यात उतरलेल्या गायकांचे आवाज टीव्ही, रेडिओवर ऐकवले जाणार नाहीत. प्रसार भारतीने ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शनवर निवडणूक संपेपर्यंत त्यांच्या आवाजावर म्हणजे गाण्यावर बंदी घातली आहे.  

निवडणुकीपर्यंत या कलावंतांची गाणी ऐकवण्यात येणार नाहीत. यात सतविंद्र बिट्टी, के. एस. माखन, महंमद सादिक, नछत्तर गिल, हरभजन मान, हंसराज हंस, मिस पूजा, बलकार सिद्धू, जस्सी जसराज यांचा समावेश आहे. हंसराज हंस- भाजप, 

बिट्टी- काँग्रेस, मिस पूजा- भाजप, के. एस. माखन- अकाली दल, सादिक- काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. गुल पनाग 
आणि कॉमेडियन गुरप्रीत घुग्गी यांच्या बाबतीत स्पष्ट झालेले नाही.
बातम्या आणखी आहेत...