आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहाचा आस्वाद घेत रस्त्यावर रंगल्या राहुल-प्रियंकाच्या गप्पा !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनभद्र-  एका चहाच्या टपरीवर राहुल गांधी यांनी चहाची ऑर्डर दिली. चहावाल्याच्या स्वत:वर विश्वासच बसेना. राहुलसाठी आणखी एक आश्चर्य म्हणजे त्यांची प्रियंकाची भेट झाली. ही प्रियंका म्हणजे त्यांची बहीण नव्हे, तर ती चहावाल्यांची मुलगी प्रियंका होती.  झाले असे की, राहुल गांधी यांनी चहावाल्या बनारसीकडे चहा मागितला. बनारसी व त्याच्या पत्नीला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. जेव्हा बनारसीची मुलगी प्रियंका हिची त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा राहुल गांधींना हसू आवरले नाही.  त्यानंतर त्यांच्यात खूप गप्पा रंगल्या. निवडणुकीच्या धामधुमीत गरीब चहावाल्यांकडे जाऊन राहुल गांधी यांनी चहा घेतल्याची चर्चा सोशल मीडियात रंगते आहे. तर हा राहुल गांधींचा स्टंट असून निवडणुकीत सर्वसामान्यांशी जवळीक साधल्याचे दाखवले, असा आरोप आहे. 
बातम्या आणखी आहेत...