आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये स्फोट घडवणाऱ्यांना अरविंद केजरीवालांचा पाठिंबा, राहुल गांधी यांनी केली टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - पंजाबमध्ये निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधींनी संगरूरमध्ये सभा घेतली. त्यात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केला. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या एका बॉम्ब स्फोटात 6 जण ठार झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले केजरीवाल त्या स्फोटांशी संबंध असलेल्या शक्तींना पाठिशी घालत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 31 जानेवारीला भटिंडा येथे झालेल्या एका स्फोटाचा उल्लेख राहुल गांधी करत होते. राहुल म्हणाले, ज्या शक्तींनी आधी पंजाबला उध्वस्त केले, ज्यांच्यामुळे हिंसा झाली त्यात शक्ती पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. 

कोणावर झाला होता हल्ला.. 
- काँग्रेसचे उमेदवार आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहीम सिंह इन्सान यांचे व्याही हरमंदर जस्सी यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. एका कारमध्ये बॉम्ब ठेवून हा स्फोट घडवण्यात आला होता. 
- एकापाठोपाठ एक तीन स्फोट जाले. ते तर वाचले. पण तिघांचा मृत्यू झाला होता. 
- डेरा सच्चा सौदाचे प्रेमी हेमराज यांच्या आरके एंटरप्राइजच्या शॉपबाहेर ही सभा होत होती. 
- 1991 नंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणुकीच्या सभेत हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यावेळी दहशतवादाचा काळ संपला होता. निवडणुकीदरम्यान हल्ले व्हायचे. 

जस्सी यांच्या कारवर फायरिंग 
- ही घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजता घडलेली आहे. पहिला स्फोट जस्सी सभेमधून त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये बसत होते तेव्हा झाला. 
- ही कार जस्सी यांच्या गाडीजवळच उभी होती. त्यानंतर आणखी दोन स्फोट झाले. जस्सी यांच्या ड्रायव्हरने वेगाने गाडी पुढे नेली तर कारवरही फायरिंग करण्यात आली. 
- 3 गोळ्या जस्सी यांच्या गाडीच्या मागच्या खिडकीवर लागल्या. जस्सी यांनी कारमधून पळून स्वतःचा जीव वाचवला. 
- स्फोट एवडा मोठा होता की, 12 फूट उंचीवर असलेली 11 केव्हीची वीजेची तार तुटली आणि एक किलोमीटर परिसरातील लोकांच्या घरातील काचा आणि दारांना हादरे बसले. 

आणखी काय म्हणाले राहुल 
- पंजाबमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी म्हणाले, नानकजींनी आम्हाला शिकवेल आहे की, सर्व काही तुझे आहे. त्यांनी आम्हाला सेवा आणि समर्पणाची भावना शिकवली. नानकजींनी आम्हाला ही शिकवण दिली. पण सध्याच्या पंजाब सरकारने सर्वकाही माझे आहे असे म्हटले. 
- पंजाबमध्ये आमची सत्ता आली तर आम्ही महिनाभरात 'चिट्टे'ची म्हणजे नशाखोरीची समस्या संपवून टाकू. असा कायदा करू की, नशेखोरीची समस्याच संपेल. नशेचा व्यवसाय करणाऱ्यांची संपत्ती जप्त करू. 
- पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला एका टप्प्यात मतदान होत आहे.     
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींच्या रॅलीतील इतर काही PHOTOS.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...