आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर : मुसळधार पावसामुळे महामार्ग बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू  - मध्यरात्रीनंतर  मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने जम्मू -श्रीनगर महामार्ग बंद झाला आहे. या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळून मातीचे ढीग जागाेजागी साचले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अनेक वाहने अडकून पडल्याने महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.  
 
साेमवारी हवामान खराब होते. यामुळे महामार्गावरील ढिगारे हटवण्याचे काम सुरू करता आले नाही. काही अडकलेली वाहने काढण्यात आली. परंतु वाहनांना दोन्ही बाजूने सोडण्यात आले नव्हते. मुसळधार पाऊस झाल्याने महामार्गावरील सेरी, डिगडोल तसेच पंथाल येथे काही जागांवर दरडी कोसळून मलबा  पसरला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रात्रीच महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. 
 
सकाळी काही काळ महामार्गावरील ढिगारे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. या दरम्यान काही वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. परंतु पुन्हा पावसास सुरुवात झाल्याने मलबा पुन्हा रस्त्यावर पसरला. त्यामुळे कोणतेही वाहन हटवण्यात आले नाही. त्यामुळे आणखी नुकसान होण्याचा धोका जास्त होता. 
 
महामार्ग वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय भगत यांनी सांगितले, आमच्या जवानांचे काम सुरू आहे. हवामान निवळताच महामार्गावरील मलब्याचे ढीग हटवण्याचे काम सुरू होईल. मग वाहने तेथून मोकळी करण्यात येतील.
  
काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा  : हवामान विभागाने काश्मीरमधील अनेक भागात हिमस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. जीवितहानी टाळण्यासाठी  लोकांनी सुरक्षित स्थळी जावे,असेही आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने  कारगिल जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. 
 
या भागातील अनेक गावांतील लाेकांना डोंगराळ भागात न जाण्याची सूचना केली आहे.  सुरक्षित स्थानांवर वास्तव्य असावे , असेही म्हटले आहे. याशिवाय, कुपवाडा आणि बांदीपोरा भागातही येत्या २४ तासात पुन्हा  हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. 
 
किश्तवाडमध्ये भूकंपाचे झटके  
विभागातील किश्तवाड जिल्ह्यात सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. यात कोणतेही नुकसान झालेले नाही. पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी हलका धक्का बसला. ज्यांना हे भूकंपाचे धक्के जाणवले ते तातडीने घराबाहेर पडले. लोकांना या धक्क्याची तीव्रता तेवढी जाणवली नाही. कारण बहुतांश लोक त्यावेळी गाढ झोपेत होते. सकाळी पाेलिस नियंत्रण कक्षातून संपूर्ण जिल्ह्याची माहिती गोळा करण्यात आली. परंतु यात कोणाचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
बातम्या आणखी आहेत...