आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री पाक, चीन सीमेवर आढावा घेणार, राजनाथ सिंहांचा तीनदिवसीय दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सोमवारपासून तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील पोलिस चौकीच्या प्रभारींना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सांबा येथून गृहमंत्र्याच्या दौऱ्याला सुरुवात होईल. येथील घगवालस्थित भारत-तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या ४७ व्या तुकडी केंद्राचे या वेळी ते निरीक्षण करतील. शिवाय, या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मेसचेही उद््घाटन करतील. त्यानंतर लेहला रवाना होतील आणि तेथून २३ सप्टेंबर रोजी दिल्लीला परततील. यापूर्वी दोन वेळा त्यांच्या दौऱ्याचे नियोजन होते. मात्र, दोन्ही वेळा ते रद्द झाले.

भारत-पाकची आज फ्लॅग मीटिंग
नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवरील सततच्या युद्धबंदी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान सोमवारी बैठक होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या चकन दा बागमध्ये दोन्ही देशांच्या लष्करातील ब्रिगेड कमांडर श्रेणीचे अधिकारी चर्चा करतील. भारतीय लष्कराच्या उत्तर तुकडीचे प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी रविवारी ही माहिती दिली.