आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ दिवसांच्या रामकथेसाठी 500 दिवसांपासून सुरू आहे तयारी; रणगाडा तैनात, सैनिक यजमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- गुजरातच्या सुरत येथे देशातील सर्वात मोठी रामकथा सुमारे ५०० गुंठे जागेवर सादर होणार आहे. एका शेतकऱ्याकडून हा पट्टा भाड्याने घेतला आहे. ३०० गुंठे जागेत पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. एखाद्या लष्कराचे प्रदर्शन वाटावे अशा पद्धतीने कार्यक्रम स्थळ सजले आहे. येथे युद्धात वापरात येणारा रणगाडाही तैनात करण्यात आला आहे.

 

हा रणगाडा लष्कराने महापालिकेला भेट दिला होता. सैनिक कल्याण निधीसाठी या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या रामकथेतून गोळा करण्यात येणारा सुमारे १५० कोटींचा निधी लष्कराला देण्यात येईल. यामुळे राम-राष्ट्रकथा असे नाव कार्यक्रम स्थळाला देण्यात आले आहे. सुरतमध्ये दोन डिसेंबरपासून १० डिसेंबरपर्यंत रामकथा सादर होणार आहे. याची तयारी गेल्या ५०० दिवसांपासून चालू आहेे. येथे रामकथा ऐकण्यास दीड लाख भाविक येण्याचा अंदाज अाहे. त्यांच्या सेवेसाठी सुमारे ५ हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. लोकांच्या सेवेसाठी १०० हून अधिक सदस्य असलेल्या ४३ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यात पाणी वाटप, भाजी, वाहतूक यासारख्या विविध व्यवस्था पाहणाऱ्या समित्या आहेत. प्रत्येक भाविकास चांगले भोजन मिळावे, यासाठी ६ लाख चौरस फूट जागेत स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे.  
मारुती वीर जवान ट्रस्टचे प्रमुख यजमान ननुभाई सावलिया यांनी सांगितले, फेब्रुवारी २०१५ मध्ये सैनिक कल्याण निधीची कल्पना सुचली हाेती. तेव्हापासून यावर नियोजन सुरू आहे. डिसेंबरमध्ये परदेशी पाहुण्यांनाही येथे येता यावे, हा उद्देश आहे. नऊ दिवसांच्या रामकथेसाठी दररोज सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. आम्ही ३० शेतकऱ्यांकडून जमीन किरायाने घेतली आहे. त्यांना एक कोटी रुपये दिले होते . पण कार्यक्रमाचा उद्देेश पाहून या शेतकऱ्यांनी पैसे परत केले. 

 

कथेपूर्वी तिरंगा फडकवून होईल राष्ट्रगीत  

- परदेशातून सुमारे ५०० हून अधिक पर्यटक या रामकथेत सहभागी होतील. यात अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेतील पर्यटक असतील.  
- कथा सुरू होण्यापूर्वी तिरंगा ध्वज फडकवून मग राष्ट्रगीत होणार आहे.  

 

 

सैनिकाजवळ असेल पोथी

कथेपूर्वी पोथीयात्रा काढण्यात येते.  ज्या पोथीचे वाचन होते त्या  पोथीची मिरवणूक काढली जाते.  या पोथ्या आयोजक किंवा त्यांचे कुटुंबीय नेतात. या वेळी पोथ्या सैनिकांच्या व अहमदाबादेतील शहीद परिवारांच्या हातात असतील.

बातम्या आणखी आहेत...