आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीनांना पकडल्यास पालकांना बोलवा: तीन मुलांच्या मृत्यूनंतर उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- दुचाकीवरून चाललेल्या तीन मुलांचा मृत्यू ओढवल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने कठोर भूमिका स्वीकारली आहे. सोमवारी मुख्य न्यायाधीश पी. के. मोहंती आणि न्या. आनंद सेन यांच्या खंडपीठासमोर वाहतूक विभागाचे अधीक्षक रंजन सिंह हजर झाले. तेव्हा मुख्य न्यायाधीश पी. के. माेहंती यांनी पोलिस अधीक्षकांना म्हटले : दुचाकीवरून जात असताना रस्ते अपघातात तीन मुलांचा मृत्यू झाला. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नाही, असे दिसते.

 रस्त्यावरून भरधाव वेगाने बाइक चालवण्यात येतात. अशा स्वारांना रोखण्यासाठी काय करत आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला. पाेलिस अधीक्षकांना  दिलेल्या आदेशात म्हटले : अल्पवयीन मुले जर दुचाकी चालवताना सापडले तर बाइकसह त्या मुलास वाहतूक पोलिस ठाण्यात आणा. त्यांच्या आईवडिलांना तत्काळ कळवा आणि ते आल्यानंतर कडक शब्दांत समज देऊन त्यांना सोडून द्या. 

वाहतुकीच्या बाबतीत कोणाची  बाजू ऐकू नका. पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे. दरम्यान, या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील,  वाहतूक पोलिस अधीक्षकांना न्यायालयात सांगायचे होते.  रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही रस्ते एकतर्फी केले जात आहेत, इत्यादी माहिती खंडपीठात देण्यात आली.  सुनावणीनंतर न्यायालयाने वाहतूक पोलिस अधीक्षकांना वाहतुकीच्या विकसित झालेल्या यंत्रणेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

विनापरवाना मुले वाहने चालवतात कशी?  
परवाना नसताना मुले वाहन चालवतात कशी? त्यांना का रोखले जात नाही, अशी न्यायालयाने विचारणा केली.  हे तरुण खूप वेगाने गाड्या चालवतात. अशा तरुणांना पकडून वाहतूक नियमानुसार कारवाई करावी. तसेच शहरात विविध भागांत गतिरोधक बनवावेत, असे आदेशही कोर्टाने दिले.  उच्च न्यायालयात वाहतूक यंत्रणेत सुधारणा करण्यावर सुनावणी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...