आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर विकून ५० लाख खर्च, तरी तिकीट कापल्याने रडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मी बरबाद झालो. घर विकून ५० लाख रुपये पक्षासाठी खर्च केले. मात्र बिहारच्या निवडणुकीत पक्षाने माझे तिकीट कापले, असे म्हणत राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते अशोक गुप्ता सोमवारी केंद्रीय मंत्री व पक्षाध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या पत्रपरिषदेत धाय मोकलून रडले.

गुप्ता यांना बिहारच्या पूर्व चंपारण्यमधील नरकटियागंजचे तिकीट हवे होते. कुशवाह यांच्यावर त्यांनी घराणेशाहीचा आरोपही केला. पत्रपरिषद संपल्यानंतरही अशोक गुप्ता तासभर रडतच होते.