आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ-वहिनींनी महिलेला 15 वर्षे खोलीत डांबले होते, गोव्यात एनजीओच्या तक्रारीनंतर सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पणजी -  गोवा पोलिसांनी १५ वर्षांपासून घरातील एका खोलीत डांबलेल्या महिलेची मुक्तता करण्यात आली आहे. ५० वर्षीय या महिलेला तिचे दोन भाऊ आणि भावजयीनेच कैद केले होते. खाणेपिणेही खिडकीतूनच दिले जात होते. पोलिसांनी चौघांनाही अटक केली. नंतर त्यांना न्यायालयाने जामीन दिला. ही घटना गोव्यातील कँडोलिम येथील आहे.  
 
एका गैरसरकारी संघटनेने (एनजीओ) पोलिसांना या महिलेबाबत माहिती दिली होती. एनजीओने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ई-मेलमार्फत आपल्याला ही माहिती दिली होती. पोलिस जेव्हा खोलीत पोहोचले तेव्हा महिलेच्या अंगावर कपडेही नव्हते. ती बाहेर येण्यासही तयार झाली नाही. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे लग्न मुंबईतील एका व्यक्तीशी झाले होते. तो आधीपासूनच विवाहित असल्याचे नंतर उघड झाल्याने ही महिला पुन्हा माहेरी परतली होती. तेथे आल्यानंतर ती वेड्याप्रमाणे वागायला लागली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
बातम्या आणखी आहेत...