आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू संघटित करण्याचे संघाचे काम कोणाच्या विरोधात नाही - भागवत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाच्याही विरोधात काम करत नाही. संघटना केवळ हिंदूंची एकजूट करते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी स्पष्ट केले. शनिवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 

पश्चिम बंगाल सरकारने मेळाव्याच्या आयोजनाला परवानगी दिली नव्हती. परंतु उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून मेळाव्यास परवानगी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर भागवत काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ते म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला केवळ हिंदूंचा दुबळेपणा कारणीभूत आहे. देशात हिंदूंचा अतिशय समृद्ध असा इतिहास राहिलेला आहे. परंतु अजूनही त्यांची परिस्थिती तशीच आहे का? हा समुदाय आपले धार्मिक रीतिरिवाज खुलेपणाने साजरे करू शकतो? देशात हिंदूंच्या मानवी हक्कास पूर्ण संरक्षण आहे का? उत्तर नाही असल्यास तुम्ही बांगलादेशातील हिंदूंंवरील अत्याचारावर हैराण का होता? आपल्यावर आेढवलेल्या स्थितीला हिंदू स्वत:च जबाबदार आहेत. या निमित्ताने भारतीय समाज व देशाला बळकट करण्याची शपथ आपण सर्वांनी घेतली पाहिजे. एकता, प्रेमाचा संदेश सर्वदूर पोहचवा. एक तृतीयांश वेळ आणि उत्पन्नातील एक तृतीयांश पैसे देशाच्या विकासासाठी खर्च करण्याची तयारी प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी केले. 
 
एकजुटीचा अभाव
हिंदूंमध्ये एकतेचा अभाव आहे. त्यामुळे अशी परिस्थिती आेढवलेली आहे. परंतु आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आपण आपले कार्य करत राहू. किंबहुना हे कार्य वाढवण्याची गरज आहे. केवळ उपदेश करून भागणार नाही, असे भागवत यांनी सांगितले.