आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अाता पक्षाची सूत्रे पुन्हा नेताजींकडेच सोपवा’, पराभवानंतर SP त असंतोषाचे सूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- अखिलेश यादव यांनी केलेले प्रयोग अंगलट आल्याने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर समाजवादी पक्षात आता असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत. पक्षाचे मार्गदर्शक मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील जुनी व्यवस्थाच कायम ठेवावी, अशी मागणी पक्षाच्या काही नेत्यांनी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाला या वेळच्या विधानसभा निवडणुकीत फक्त ४७ जागा मिळवता आल्या. २०१२ मध्ये त्या पक्षाने २२४ जागा जिंकल्या होत्या.  

अखिलेश यांनी आता पक्षाची सूत्रे वडील मुलायमसिंह यांच्याकडे द्यावीत, अशी मागणी पक्षाचे नेते, विशेषत: मुलायमसिंह आणि शिवपालसिंह यांच्या जवळचे नेते करत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एक नेता म्हणाला, ‘विधानसभा निवडणूक म्हणजे परीक्षा आहे, असे म्हणत अखिलेशजी यांनी फक्त निवडणुकीपर्यंतच पक्षावर नियंत्रण करू द्या, अशी मागणी केली होती. आता ते परीक्षेत नापास झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षाचे नेतृत्व नेताजींकडे सोपवावे. अयोध्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर पक्षासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. तेव्हाही आम्ही पक्षाची काळजी घेतली होती आणि आता आम्ही पुन्हा ती काळजी घेऊ... अखिलेश यांच्या भवितव्याचीही काळजी घेण्याचे वचन देत आहोत. आता नेताजींच्या सूचना आणि मार्गदर्शन यानुसारच पक्षाला काम करू द्यावे.’

पराभवासाठी कोणी एक दोषी नाही  
पराभवासाठी कोणत्याही एका व्यक्तीला दोषी ठरवता येऊ शकत नाही. मतदारांचे मन वळवण्यात आम्ही कमी पडलो. प्रचंड आश्वासने दिल्याने लोकांचा कल भाजपकडे वळला. लढा देणे हे आमच्या रक्तातच आहे. आम्ही पुन्हा लढा देऊ, विजय मिळवू.  
- मुलायमसिंह यादव, सपचे संरक्षक
 
अामचा लढा सुरूच राहील  
‘समाजवादी पक्ष हा फक्त पक्ष नाही, ते एक तत्त्वज्ञान आहे. आमचा लढा सुरूच राहील. मी पक्षाची कामगिरी आणि निकालाचे विश्लेषण करेन. पुढील आठवड्यात पक्षाचे उमेदवार आणि आमदार यांची बैठक होईल. त्यानंतर पक्षाची नवी व्यूहरचना ठरवू.  
- अखिलेश यादव, मावळते मुख्यमंत्री,  (पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत)

‘मुलायमसिंह यांच्या आरोपाला बळकटीच मिळाली’
प्रत्येक पराभवानंतर रामगोपाल यादव केंद्रनिहाय रेकॉर्ड मागवत असत आणि ज्या केंद्रांमध्ये कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसेल तेथील कार्यकर्त्यांचा ‘छळ’ करत असत. रामगोपाल हे भाजपच्या हातातील बाहुले असून, ते अखिलेश यांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत, असा आरोप मुलायमसिंह यांनी केला होता. त्याला आता बळकटी मिळाली आहे, अशी टिप्पणीही या नेत्यांनी केली.

मुलायम, शिवपाल यांनी दिलेले उमेदवारच विजयी : राय  
पक्षाचे माजी प्रवक्ता आणि संस्थापक सदस्य सी. पी. राय म्हणाले की, ‘मुलायमसिंह आणि शिवपाल यादव यांनी ज्यांना तिकिटे दिली, तेच बहुतांशपणे निवडून आले आहेत. अपवाद फक्त दोन किंवा तीन उमेदवारांचा आहे. तिकीट वाटप हाही वादाचा मुद्दा होता. शिवपाल यांच्या पराभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते, पण ते तर अगदी सहजपणे विजयी झाले. प्रशांत यादव यांच्यासाठी मुलायमसिंह यांनी जौनपूरमध्ये सभा घेतली. त्यामुळे आधी धोक्यात असलेली ही जागा सपाने जिंकली. यावरून मुलायमसिंह यांचा प्रभाव सिद्ध होतो. नेताजींनी लखनऊ छावणी मतदारसंघात सून अपर्णा यादव यांच्यासाठी सभा घेतली होती, तरीही त्या पराभूत झाल्या. याचे कारण म्हणजे तेथे पक्षाचा आधारच नव्हता.’  पक्षाचे आणखी एक नेते मधुकर जेटली म्हणाले, ‘मुलायमसिंह यांना पूर्वीचाच सन्मान मिळायला हवा. त्यांना पक्षासाठी प्रचार करायचा होता. पक्षात गेल्या सहा महिन्यांपासून झालेल्या घडामोडी हेही पराभवाचे एक कारण आहे. 
बातम्या आणखी आहेत...