चंदिगड - महिलांची कुचंबणा टाळण्याच्या हेतूने हरियाणा सरकारने राज्यातील प्रत्येक कार्यालयामध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा उच्च शिक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनजागृतीचा अभाव आणि कुचंबणेमुळे अनेकदा महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्यात नकारात्मक भाव निर्माण होतो. ही मानसिकता दूर करून महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सॅनिटरी नॅपकीनची सुविधा कार्यालयांमध्ये २४ तास उपलब्ध राहील. वापरलेले नॅपकिन्स टाकून देणे हा महिलांपुढे मोठा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव सोबत बाळगावे लागते.