आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयातील छळाबद्दल 70 टक्के महिला तक्रार देत नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
हैदराबाद   - कार्यालयात होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल सरासरी ७० टक्के महिला तक्रार नोंदवत नाहीत, असा धक्कादायक दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव सतबीर बेदी यांनी केला.  
 
कार्यालयीन कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होतो, अशा अनेक तक्रारी देशभरातून येत असतात. परंतु वास्तव वेगळे आहे. छळाच्या प्रत्यक्ष घटना खूप अधिक आहेत. प्रत्यक्ष त्याबद्दलच्या तक्रारी मात्र नगण्य दिसून येतात. त्यावरून सरासरी ७० टक्के महिला आपल्यावरील अत्याचाराबद्दल तक्रार करण्याचे धारिष्ट्य दाखवत नाहीत हे स्पष्ट झाले आहे. अशा गोष्टी दिसून येत असतानाच महिलांमधील काही प्रवृत्ती कायद्याचा आधार घेऊन ब्लॅकमेल करण्याचे कामही करतात, असे बेदी यांनी सांगितले. तेलंगणा राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित ‘नोकरीच्या
ठिकाणी लैंगिक छळ : कायदा आणि उपाय’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी मार्गदर्शन केले.  
कायद्यातील प्रतिबंधात्मक तरतुदी चांगल्या 
छळवणुकीपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी कायद्यात पुरेशा तरतुदी करून ठेवण्यात आल्या आहेत. कायद्यात प्रतिबंधात्मक अशी व्यवस्था आहे. म्हणूनच कायद्यात दोष नाही, असे बेदी यांनी सांगितले.   
 
काही संस्थांची वागणूक अयोग्य  
लैंगिक छळाच्या प्रकरणात काही संस्था बेजबाबदारपणे वागतात. ही बाबदेखील असे गुन्हे घडण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणूनच त्यावर संवेदनशीलपणे पावले उचलली जावीत म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे काही शिफारशी पाठवल्या आहेत. त्यामुळे कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होऊ शकेल, असे तेलंगणा राज्य आयोगाच्या प्रमुख टी. वेंकटरत्नम यांनी परिसंवादात सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...