आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर यूवर फूड : कुणीही निष्पाप भुकेला झोपू नये यासाठी युवक वाटताहेत अन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद - रात्री कुणीही निष्पाप अनाथ भुकेला झोपी जाऊ नये यासाठी फरिदाबादचे काही युवक आपले जेवण शेअर करताहेत. हे युवक नाइट क्लबमध्ये पार्टी करण्याऐवजी त्या पैशाला झोपडपट्टी वस्तीतील मुलांवर खर्च करतात. या युवकांनी शेअर युवर फूड बॉक्स नावाने एक ग्रुप तयार केला आहे. यामार्फत ते रात्री प्रत्येक भुकेल्यापर्यंत जेवण पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जेवणात फक्त चपाती, भाजीच नसते तर यातील प्रत्येक मेन्यू दर वेळेस वेगवेगळा असतो. या मुलांना ते सर्व खाण्याच्या वस्तू देतात, जे महागड्या रेस्टॉरंट व हॉटेलातच मिळतात, ज्या जेवणाला ते कधीही अॅफोर्ड करू शकत नाहीत. हे रात्री जेवण वितरित करण्याचे काम करत आहेत. कुणीही अनाथ-निष्पाप व्यक्ती भुकेल्या पोटीच झोपी जाऊ नये. प्रत्येक रात्री जवळपास ५० ते ६० मुलांच्या ग्रुपचे सदस्य हे जेवण वाटताहेत. ग्रुपचे सदस्य हे जेवण अधिकतर आपल्या घरांमधूनच गोळा करतात. अनेकदा हॉटेल-रेस्टॉरंटशी टायअप झाल्याने तिथूनही कधी कधी जेवण मिळते.

जेवणाचा मेन्यू दरवेळी वेगवेगळा
दिव्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळी त्यांच्या फूड बॉक्सचा मेन्यू वेगळाच असतो. यासाठी हा ग्रुप रेस्टॉरंट व हॉटेलबरोबरही टायअप करतात. घरातूनही अन्न एकत्र करतात. यास बॉक्समध्ये पॅक करून रात्रीच्या वेळी झोपडपट्टी परिसरात जाऊन मुलांना देतात. मेन्यूत कधी समोसा, चाऊमीन व फास्ट फूडदेखील दिले जाते.

मुलांबरोबर साजरी करतात पार्टी
या ग्रुपचे सदस्य पार्टी करण्याऐवजी या मुलांबरोबरच पार्टी ठेवतात. एका जागी एकत्र होऊन तिथे या मुलांबरोबर पार्टी साजरी करतात.

अशी झाली सुरुवात
संस्थेच्या अध्यक्षा दिव्या दिलबागी यांच्या म्हणण्यानुसार अनेक बार, रेस्टॉरंट व हॉटेलवर जेव्हा जेव्हा आम्ही जेवायला जात असू तेव्हा तिथे मोठ्या संख्येत अशी लहान लहान मुले दिसायची, जी अन्नासाठी पैशासाठी इतरांसमोर हात पसरत असत. इथूनच आम्ही विचार केला की, का नाही आपण या मुलांनाही हॉटेल रेस्टॉरंटच्या जेवणाचा आनंद देऊ नये. इथूनच त्यांनी प्रारंभ केला की, शेअर युवर फूड बॉक्स ग्रुपची ही कल्पना त्यांनी आपल्या मित्रांबरोबर शेअर केली. तेव्हा नोव्हेंबर २०१५ पासून दिव्याने या मुलांसह फूड शेअर करण्याची मोहीम चालवली. सोशल साइटवर ही मोहीम सुरू केली. आता जवळपास १०० युवकांची टीमच तयार झाली आहे. संस्थेचे उपाध्यक्ष गौरव शर्मा, जनरल सेक्रेटरी चिराग भल्ला, नूपुर आनंद, अंकित दिलबागी आॅपरेशन मॅनेजर, कोशाध्यक्ष दीक्षा आहुजा व सहकोशाध्यक्ष मुकुंद वर्मासह सर्व मिळून ही संपूर्ण मोहीम चालवतात.
बातम्या आणखी आहेत...