आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकलांनी मुख्यमंत्री व्हावे ‘पक्ष व सरकारची सूत्रे एकाच व्यक्तीकडे असावीत’ : एम. थंबीदुराई,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- अद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व्हावे, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी सोमवारी व्यक्त केले. पक्ष आणि सरकारचे नेतृत्व एकाच व्यक्तीकडे असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  

थंबीदुराई यांनी पोएस गार्डन येथे शशिकला यांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले. पक्ष आणि सरकारचे नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असावे, या आपल्या मताला पुष्टी देण्यासाठी उत्तर प्रदेशमधील सध्याच्या राजकीय स्थितीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये पक्ष वडिलांच्या बाजूने आहे, तर सरकार मुलाच्या. त्यामुळे मी हे मत व्यक्त करत आहे.  शशिकला यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी याआधी केले आहे.  थंबीदुराई म्हणाले की, शशिकला ऊर्फ चिन्नम्मा या योग्य व्यक्ती आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी दिलेली आहे. आता सरकारचीही जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि अम्मांचे (जयललितांचे) काम पुढे न्यावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. शशिकला यांनी या आवाहनाला काय प्रतिसाद दिला, या प्रश्नावर थंबीदुराई म्हणाले की, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही. निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यासाठी पक्ष सत्तेत आला आहे. ज्या व्यक्तीकडे पक्षाचे सर्वोच्च पद असते तिच्याकडेच सरकारचीही सूत्रे असतील तर ही आश्वासने पूर्ण केली जाऊ शकतात, असे माझे मत आहे.  

जयललितांचे उदाहरण  
पक्षाचे प्रमुखच सरकारचेही प्रमुख झाल्याची केंद्र आणि राज्यांमध्ये अनेक उदाहरणे आहेत. जयललिताही आधी पक्षाच्या प्रमुख होत्या. त्यानंतर पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या, याकडे थंबीदुराई यांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...