आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमला महामार्गावर शेकडो वाहनेे अडकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सिमला - सिमला-कालका राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक २२)वर  जबली ते परवानू आणि धरमपूरदरम्यान मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  
 
या रस्त्याच्या बांधणीचे काम सुरू आहे. दरम्यान,  शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या. दरडी कोसळल्यामुळे शनिवारी महामार्ग बंद राहिला. यासंदर्भात माहिती देताना पोलिस उपअधीक्षक परवानू भीष्म यांनी  सांगितले की, हा महामार्ग दोन्ही बाजूने बंद झाला असून शेकडो वाहनांमध्ये सफरचंद वाहून नेणारे ट्रकसुद्धा अडकले आहेत. या मार्गावरील वाहतूक कौसाली-भोजनगर आणि जंगेशूमार्गे वळवण्यात आली आहे.  
 
सिमला, सोलन आणि वरच्या भागात येथे शनिवारी दूध, फळे, भाजीपाला आणि ब्रेड आदी जीवनावश्यक वस्तू आणि वृत्तपत्रेही पोहोचू शकली नाहीत. डोंगर कापले जात असल्यामुळे दरडी कोसळत आहेत, असे त्यांनी सांगितले.पोलिस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहे. महामार्गावरील मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. वाहतूक जाममुळे लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून पूर्वसूचना दिल्या जात आहेत. 
बातम्या आणखी आहेत...