आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका, इंग्लंडपेक्षा मध्य प्रदेश किती तरी चांगले; नेटिझन्सच्या टीकेनंतरही चौहान ठाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा दर्जेदार असल्याचा दावा केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर मध्य प्रदेश अमेरिका, इंग्लंडसह अनेक देशांच्या तुलनेत किती तरी चांगले आहे, असे आता त्यांनी म्हटले आहे.  

मध्य प्रदेशच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बुधवारी रात्री चौहान बोलत होते. आपला देश सोडून इतर देश चांगले आहेत, असे मानणे दळभद्री मानसिकता दर्शवणारे आहे. खरे तर मध्य प्रदेश अमेरिका, इंग्लंड आणि इतर देशांपेक्षा किती तरी चांगले आहे. तुम्ही सकारात्मक पद्धतीने पाहायला शिकले पाहिजे. राज्याविषयीचा अभिमान महत्त्वाचा आहे. इतर देश चांगले वाटू लागतात, हे दरिद्री मानसिकता दाखवणारे आहे, असे चौहान म्हणाले. 
 
वॉशिंग्टनच्या विमानतळाजवळील अनुभव  
मी वॉशिंग्टनच्या विमानतळावर गेलो होतो तेव्हा काही अंतरावर गेल्यानंतर मला तेथील परिसरातील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्त्यांची स्थिती जास्त चांगली वाटली. त्यामुळेच मला मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले वाटतात. मी हे अनुभवले आहे. केवळ बोलायचे म्हणून हा दावा मी करत नाही, असे चौहान यांनी सांगितले. चौहान २४ ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या राजधानीत एका सामरिक भागीदारीच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी गेले होते.  
 
पुढील स्‍लाईडवर पहा, काय म्‍हणाल्‍या उमा भारती आणि काँग्रेस नेते ज्याेतिरादित्य शिंदे... 
 
बातम्या आणखी आहेत...