आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेण्या कापण्याचा संशय, जवानास बेदम मारहाण; अनेक ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा येथे मंगळवारी  वेणी कापल्याचा आरोप करत जमावाने एका सैनिकास बेदम मारहाण केली. लष्कराने सैनिकाची सुटका केल्यानंतर खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात लोक एकत्र आले असून गंभीररीत्या जखमी झालेल्या जवानास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी, नौगाम येथे पोलिसांनी सोमवारी कचरा गोळा करणाऱ्यांची जमावापासून सुटका केली होती. त्यांच्यावर स्थानिक लोकांनी वेण्या कापल्याचा अारोप ठेवून हल्ला चढवला होता.  

गेल्या २४ तासांत सुमारे अर्धा डझन वेण्या कापण्याच्या घटनांच्या विरोधात श्रीनगर व काश्मीरच्या अनेक भागांत निदर्शने सुरू आहेत. बेगपोरा भागात वेण्या कापण्याच्या घटनांमुळे संतप्त जमावाने नातिपोरा-रामबाग रस्ता रोखून धरला. यामुळे चरार-ए-शरीफला जाणारा मार्ग काही तास बंद होता, तर बारजुला येथे एका मुलीची वेणी कापल्याची तक्रार घेऊन लोक पोलिस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांच्या भूमिकेवर संतप्त जमावाने रस्त्यावरच निदर्शने सुरू केली. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. शोपियां येथे निदर्शकांनी सुरक्षा दलाच्या वाहनांवर दगडफेक केली. याआधीही ५ ऑक्टोबरला संतप्त जमावाने एका ७० वर्षांच्या वृद्धास वेणी कापणारा समजून बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

विशेष पोलिस पथक स्थापन, ६ लाखांच्या बक्षिसाची घोषणा
हुर्रियत नेत्यांनी वेणी कापण्याच्या घटना म्हणजे स्वातंत्र्यापासून काश्मिरींचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारचा कट असल्याचा आरोप केला होता. यासाठी बंदही पाळण्यात आला. श्रीनगर येथे वेण्या कापण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून  संशयावरून काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळला आहे. अशा वेण्या कापण्याच्या विरोधात एक विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले आहे. या घटनेची माहिती देणाऱ्यास ६ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...