आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्काराला फाशी तर लिव्ह इन साठी 7 वर्षांची शिक्षा, हे राज्य करणार अधिक कठोर कायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपर्डी खटल्यातील आरोपींवर आरोपनिश्चिती झाली असून मंगळवारी आणि बुधवारी त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. या आरोपींना फाशी किंवा किमान जन्मठेपेची शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाण्याची अपेक्षा आहे, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे. निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल करत बलात्काराच्या विरोधातील शिक्षा अधिक कठोर करण्यात आली. पण आता मध्य प्रदेशने बलात्कारासाठीची शिक्षा अधिक कठोर करता यावी यसासाठी कायदा आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नव्या कायद्यानुसार दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या चिमुरड्यांबरोबर सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना आता फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे. राज्य सरकार त्यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. या विधेयकाचा मसुदा मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. 


जन्मठेपेची शिक्षा 14 वर्षे नव्हे तर मृत्यूपर्यंत (आयुष्यभरासाठी) असावी यासाठीही कायद्यात बदल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढणे, महिलांचा अपमान करणे, पाठलाग करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे आणि अश्लिल हावभाव करणे अशा प्रकरणांमध्येही शिक्षा अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. 


लग्नाचे आमीष दाखवून महिलेबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणेही महागात पडण्याची शक्यता आहे. महिलेने जर पोलिस ठाण्यात सेक्श्युअल हॅरेशमेंटची तक्रार केली तर त्यातही 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भारतीय दंड विधान (आइपीसी), गुन्हेगारी (सीआरपीसी) च्या कलमांत बदल करून 493 हे नवे कलम प्रस्तावित करण्यात आले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...