आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP निवडणुकीनंतर तीन तलाकवर बॅन : प्रसाद; कटियार म्हणाले, राममंदिर हवे तर सत्ता द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले, ही परंपरा महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहे. त्यावर बंदी घालणे गरजेचे आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले, ही परंपरा महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहे. त्यावर बंदी घालणे गरजेचे आहे. (फाइल फोटो)
गाझियाबाद/लखनौ - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांनंतर सरकार तीन तलाकवर बॅन लावण्याचा निर्णय घेऊ शकते, असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ही प्रथा महिलांच्या सन्मानावर गदा आणणारी आहे, त्यामुळे यावर बंदी घालणे गरजेजे असल्याचे ते म्हणाले. 

सुप्रीम कोर्टातची उपस्थित करणार मुद्दा 
- केंद्रीय कायदेमंत्री प्रसाद प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की, सरकार उप्र निवडणुकीनंतर तीन तलाकवर बंदी लावण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते. 
- केंद्र सरकार ही वाईट प्रथा बंद करण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांना न्याय, समान हक्क आणि सन्मान मिळावा या तीन मुद्द्यांसाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही ते म्हणाले. 
- या मुद्द्याची धर्माशी काहीही संबंध नाही. पण महिलांच्या सन्मानाशी संबंधित असा हा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. 

केवळ भाजपलाच महिलांचा आदर 
- समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाने या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी असेही रवीशंकर प्रसाद म्हणाले. 
- भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसाद म्हणाले की, केवळ आमचा एकच पक्ष असा आहे, जो महिलांचा आदर करतो. 
- इतर पक्ष त्यांना स्थानही देत नाही आणि महिलांचा आदरही करत नाही. 
- बसपावरही त्यांनी हल्लाबोल केला. बसपाने जातीच्या राजकारणातून बाहेर पडत महिलांचा आदर करावा असे ते म्हणाले.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, विनय कटियार म्हणाले.. मंदिर बनवायचे असेल तर पूर्ण बहुमत हवे.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...