आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरगडमध्ये राजस्थानमधून आणलेल्या 40 लाख टन दगडांनी तयार होतेय भव्य मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - मां बम्लेश्वरी मंदिरामुळे देशभर प्रसिद्ध डोंगरगडच्या चंद्रगिरी पहाडावर छत्तीसगडचे सर्वात मोठे दिगंबर जैन मंदिर आकारास येत आहे. विशेष म्हणजे राजस्थानमधून आणलेले ४० लाख टन दगड पहाडावर पोहोचले असून प्रत्येक दगड घडवला जात आहे. येथे दोन राज्यांतील २०० कलावंत रात्रंदिवस दगड घडवण्याचे काम करत आहेत. या गतीने २०१८ पर्यंत मंदिर तयार होईल. सध्याच्या काळात दगड घडवून भव्य मंदिर तयार होणारे राज्यातील पहिलेच उदाहरण असेल.  ‘भास्कर’च्या टीमने चंद्रगिरी पहाडावर जाऊन सर्व माहिती घेतली. तेथे काही घडवलेले आणि काही अर्धवट घडवलेले दगड दिसले. राजस्थानी तसेच भिंड-चंबलिया कलावंत दगडांत प्राण ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. अवजारेही पारंपरिक होती.  
 
पुढील स्लाईड वर पाहा फोटो...