आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी-गालब्लॅडरमध्ये नव्हे, तर तरुणीच्या मेंदूत खडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- आतापर्यंत आपण किडनी तसेच पित्ताच्या पिशवीतच खडे झाल्याचे ऐकलेले असेल, परंतु मेंदूमध्यही खडे होऊ शकतात. एसएमएस हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी विभागात झुंझुनू येथील रहिवासी २० वर्षीय एका तरुणीच्या तपासणीत मेंदूत खडा असल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय भाषेत याला अल्ब्राइट हेरिडिटरी ऑस्टियोडिस्ट्रोफी म्हणतात. दहा लाखांपैकी तीनमध्ये हे पाहायला मिळते. तरुणीच्या मिर्गी झटक्याला औषधांच्या माध्यमातून पूर्णपणे नियंत्रित करण्यात आले आहे. एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. यू. एस. अग्रवाल यांनी सांगितले की, न्यूरॉलॉजी विभागाचे डॉ. आर. एस. जैन यांचे दुर्मिळ आजाराचे शोधपत्र अल्ब्राइट हेरीडिटरी ऑस्टियोडिस्ट्रोफी- ब्रेन स्टोन्स जागतिक ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एसएमएस हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी विभागाचे सीनियर प्रोफेसर डॉ. आर. एस. जैन यांनी सांगितले की, तरुणीला मागील दहा वर्षांपासून वारंवार मिर्गीचे झटके येण्याची तक्रार होती. त्याचबरोबर पायांच्या नसांमध्ये ताण पडणे, गोळे येणे या त्रासाने ती त्रस्त होती. रक्ततपासणी केल्यानंतर कॅल्शियमची कमतरता, फॉस्फेट व पॅराथायरॉइड हार्मोनची मात्रा अधिक होती, जी मेंदूत खडा बनवण्यास कारणीभूत आहे.

कॅल्शियम साचले
मेंदूचे सीटी स्कॅन केल्यानंतर बैजल गॅगलिया, थॅलेमस, डेन्टेट न्यूक्लियस आणि सबकाॅर्टिकल व्हाइट स्वरूपात कॅल्शियम साचले होते. आजाराचा शोध अल्ब्राइट नावाच्या महिला शास्त्रज्ञांनी लावला. त्यामुळे त्यास तिच्या नावानेच ओळखले जाते.

वैशिष्ट्ये : तरुणीची अंगकाठी बारीक, दोन्ही पायांचे चौथे बोट लहान, डोक्याच्या काही भागात केसांचे प्रमाण कमी, दातही व्यवस्थित नाहीत, त्वचेचा रंग काळवंडलेला, हात आखडलेले होते,

-मागील दहा वर्षांपासून मिर्गीचे झटके येत होते.
- मेंदूच्या भागात बॅजल गॅगलिया, थॅलेमस, डोन्टेट न्यूक्लियस आणि सबकाॅर्टिकल व्हाइट स्वरूपात कॅल्शियम साचले .