आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबूल सुप्रियोंवर दगडफेक, म्हणाला 'तृणमूलच्या गुंडांनी दगडफेक केली, कार फोडली'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसनसोल - केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर बुधवारी पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाला. भाजप कार्यकर्त्यांट्या अटकेच्या निषेधार्थ ते आसनसोलमध्ये निदर्शने करत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर विटा तसेच दगडांचा मारा करण्यात आला. एक दगड त्यांच्या छातीवरही लागला. या घटनेनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. जमावाने गाड्यांची तोडफोड केली.

बाबुल सुप्रियो यांनी नंतर ट्विट करून आपले छायाचित्र पोस्ट केले. त्यांनी लिहिले की, ‘मी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यात जात होतो. त्या वेळी काही लोकांनी माला दगड मारले आणि माझ्या कारची तोडफोड केली. हल्ला करणाऱ्या जमावात तृणमूल काँग्रेसचे काही गुंडही होते. ते सर्व जण तृणमूल काँग्रेसचे नेते मलय घटक यांचे समर्थक होते. पोलिसांनी आमच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याऐवजी भाजपच्या समर्थकांनाच अटक केली.’ दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांत चकमक झाल्यानंतर पोलिसांनी ५७ जणांना अटक केली.
बातम्या आणखी आहेत...