आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉपर्स घोटाळा : बिहार बोर्डाकडून २०८ इंटर कॉलेजच्या चौकशीचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमध्ये २०८ इंटर महाविद्यालयांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बिहार बोर्ड प्रशासनाने हे आदेश जारी केले असून या महाविद्यालयांच्या चौकशीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर टाकण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांवर हे चौकशीचे काम सोपवण्यात येणार आहे. इंटर परीक्षेत आर्ट विभागातून टॉपर आलेल्या रुबी रायसह काही विद्यार्थ्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत.
टॉपर घोटाळा प्रकरणात बोर्ड प्रशासन महाविद्यालयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. परंतु राज्याच्या शिक्षण विभाागने कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर बोर्ड प्रशासनाला इंटर महाविद्यालयांच्या चौकशीचे आदेश जारी करावे लागले आहेत. पुढील महिन्यात या प्रकरणी चौकशी सुरू होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात २०१४ ते २०१६ या काळात ज्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली त्यांची चौकशी केली जाणार आहे. बोर्ड प्रशासनाने कठोर निर्देश दिले असून ज्या महाविद्यालयांनी निकष पूर्ण करता मान्यता मिळवली आहे, त्यांची मान्यता तत्काळ काढली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांत बोर्डाकडून २०८इंटर महाविद्यालयांनी मान्यता देण्यात आली होती. ही सर्व इंटर महाविद्यालये चौकशीच्या कक्षेत येतील, असे शिक्षणमंत्री डॉ. अशोक कुमार यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. ही बाब लक्षात घेता पहिल्या टप्प्याच्या चौकशीची ढोबळ रूपरेषा तयार करण्यात आली आहे. त्याअनुषंगानेच दोन वर्षांत मान्यता मिळालेल्या इंटर महाविद्यालयांची चौकशी अशी कक्षा ठरवण्यात आली आहे. तपास पथकाला एक चेकलिस्टही देण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थी शिक्षकांकडून सुविधा त्यांच्या अडचणींची माहिती घेण्यात येणार आहे. प्रक्रियेत पारदर्शकता राहावी म्हणून चौकशी प्रक्रियेची छायाचित्रे व्हिडीओ चित्रणदेखील केले जाणार आहे. हे सर्व पुरावे एकत्र केल्यानंतर जर कुणी महाविद्यालयीन प्रशासनाने चौकशीला न्यायालयात आव्हान दिले तर हे सर्व पुरावे सादर करणे बोर्डाला सोपे जाणार आहे.

याबाबत बोर्डाचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत चौकशी पथकाचा अहवाल आल्यानंतरच नियमानुसारच कारवाई केली जाईल.

विद्यार्थ्यांची अटक चुकीची; घोटाळ्यास नितीश जबाबदार : कुशवाहा
दरम्यानकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी टॉप घोटाळ्यातील आरोपी विद्यार्थिनी रुबी राय हिच्यासह इतर विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अटकेला विरोध केेला आहे. या घोटाळ्याला मुख्यमंत्री नितीशकुमार हेच जबाबदार आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत हा घोटाळा झाला. त्यांच्यासमक्षच ज्यांनी हा घोटाळा केला त्यांनी बिहारची शैक्षणिक व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम केले आहे. परीक्षा काळात मुलांची कॉपी तपासणाऱ्यांनाही तुरुंगात धाडा. संपूर्ण बिहारमध्ये प्रॅक्टिकल करताच मुलांना चांगले गुण कसे मिळतात? असा प्रश्न विचारत त्यांनी हाही एक मोठा घोटाळाच असल्याचा आरोप त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...