आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी शाळेत जात नव्हती, तिच्या घरी गेले, तेथे कॅन्सरग्रस्त आजोबा आपल्या नातीच्या मदतीने स्वत:ची कबर खोदत होते...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६७ व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्यूरी अवाॅर्ड विजेता चित्रपट “आबा’चे दिग्दर्शक अमर कौशिक मूळचे चंदिगडचे रहिवासी. भागलपूरशी त्यांचे कौटुंबिक नाते आहे, पण ते लहानाचे मोठे  अरुणाचल प्रदेशात झाले. त्यांचे वडील एल. आर. कौशिक वन विभागात रेंजर होते, तर आई शशी कौशिक या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या.
 
चित्रपट आबाची कथा अमरला आईनेच खूप दिवसांपूर्वी सांिगतलेली होती. यावर अमर यांनी चित्रपट तयार केला. अमरच्या आई शशी कौशिक यांनी चित्रपटाच्या कथेमागची कथा दैनिक भास्करचे वार्ताहर मदन यांना सांगितली. अमरच्या आईने सांगितलेली चित्रपटाची कथा त्यांच्याच शब्दात....  
 
“ही त्या काळातील गोष्ट आहे, तेव्हा माझे पती एल. आर. कौशिक अरुणाचल प्रदेशात वन विभागात रेंजर पदावर कार्यरत होते. मी एका सरकारी शाळेत शिक्षिका होते.  शाळेत अनेक मुली शिकत असत. त्यापैकी एका मुलीने अचानक शाळेत येणे सोडले. मी  त्या मुलींचा शोध घेत तिच्या घरी पोहोचले. तेथील दृश्य पाहून मी खूप हेलावले. त्या मुलीचे आजोबा कॅन्सरने आजारी होते. ती आजोबांची शुश्रूषा करत होती.  
 
यामुळे तिला शाळेत येणे जमले नाही. इतकेेच नव्हे तर त्या मुलीच्या आजोबांना याची जाणीव होती की, ते आता काही दिवसांचेच सोबती आहेत. घरात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासही कोणी नाही. केवळ ती नात आहे. यासाठी त्यांनी नातीच्या मदतीने स्वत:साठी कबर खोदून ठेवली होती.
 
मरण पावल्यानंतर लागणारे आवश्यक ते साहित्य त्या दोघांनी जमवून ठेवले होते.  या दृश्याने माझ्या मनात घर केले. मी माझा मुलगा अमर कौशिक यास ही कथा सांगितली. त्याला ती खूप आवडली. अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या अमरने लोकांशी बोलून या घटनेची माहिती जाणून घेतली.  
 
त त्या  कुटुंबाची भेट घेऊन तिच्या भावना जाणून घेतल्या. गेल्या वर्षी होळीनंतर ते आपल्या टीमसह अरुणाचल प्रदेशात आले.    त्याने चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. चित्रपटाचे नाव ठेवले “आबा’ याचा अर्थ होतो आजोबा. सुमारे २२ मिनिटांच्या या लघु चित्रपटात त्याने कथा सांगितली आहे.’  
 
पुरस्कारामुळे आईचा आनंद  द्विगुणित 
पुरस्कार मिळाल्याने मुलांपेक्षा जास्त आनंद मला झालेला आहे. मला दुहेरी आनंद यासाठी की, एक तर मुलाने अशी हृदयस्पर्शी कथा या चित्रपटासाठी निवडली. ही कथा खूप जवळून मी अनुभवली आहे. दुसरा अानंद यासाठी की, माझ्या मुलास इतका मोठा  पुरस्कार मिळाला.  एका आईसाठी यापेक्षा आणखी मोठा आनंद कोणता असू शकतो? अमर यांनी सांगितले, बर्लिनमध्ये शॉर्ट फिल्मची निवड होणे हीच खूप मोठी गोष्ट होती. 
बातम्या आणखी आहेत...