आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहाय गर्भवती महिलेचा जीव वाचवा : सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाटण्यात भररस्त्यावर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर गर्भवती राहिलेली ३५ वर्षीय महिला एचआयव्हीग्रस्त असून तिने २६ आठवड्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयास मागितली. न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले : ‘या महिलेस गंभीर आजार असून ती असहाय आहे. तिचा जीव वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
 
’ ५ मे रोजी या महिलेस पाटण्याहून विमानाने दिल्लीला एम्समध्ये उपचारासाठी आणावे, असे आदेशही केंद्र सरकारला दिले. याचा खर्चही केंद्राने करावा. एम्सच्या वैद्यकीय बोर्डाकडून तिच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात. याचा अहवाल प्राप्त होताच ८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.  यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, पीडितेला १२ वर्षांपूर्वी पतीने सोडून दिले आहे. तेव्हापासून ती पाटण्याच्या रस्त्यावर हिंडत जीवन कंठते आहे. एकदा ती रस्त्यावर झोपेत असताना तिच्यावर काही लोकांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती गर्भवती राहिली. पोटातील गर्भ १७ महिन्यांचा झाल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिचा गर्भपात करण्याची परवानगी मागितली.
 
 उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा ती एचआयव्ही बाधित असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय बोर्डाने गर्भपातासाठी ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने गर्भपाताची परवानगी देण्यास नकार दिला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.  कायदेशीर प्रक्रियेतून जाताना आता गर्भ २६ आठवड्याचा झाला आहे. एचआयव्ही बाधित असल्याने मुलासह तिच्या जिवालाही धोका आहे, असे न्यायालयात त्या महिलेच्या वतीने सांगण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...