आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोनवर जातिवाचक शिवीगाळ गुन्हा, 5 वर्षांपर्यंतची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली- अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणावरून एखाद्याने फोनवर जातिवाचक अपशब्द वापरला किंवा शिवीगाळ केली तर हा गंभीर गुन्हा ठरतो. पुरावे व साक्षींच्या आधारे हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला तर पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर व एस. अब्दुल नजीर यांनी उत्तर प्रदेशातील अशाच एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे स्पष्ट निर्देश दिले. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने फोनवर एका अनुसूचित जातीच्या महिलेस अपशब्द वापरले होते. या दोघांत जमिनीचा वाद होता. महिलेने यावर न्यायालयात दाद मागितली. नंतर कनिष्ठ न्यायालयाने व हायकोर्टानेही त्याला शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून शिक्षा कायम ठेवली.
बातम्या आणखी आहेत...