आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री योगी म्हणाले, भारतमातेच्या सुपुत्रांचे रक्त व घामातून ताज उभा राहिलाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर/ कोलकाता/ नवी दिल्ली- ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याच्या भाजप आमदार संगीत सोम यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रचंड वाद पेटला आहे. यावर उत्तर प्रदेशचे योगी सरकार सतर्क झाले असून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी सोम यांना माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, योगी २६ ऑक्टोबरला ताजमहाल पाहण्यासाठी जात आहेत. 

ही वास्तू कोणी कुणासाठी बांधली याला महत्त्व नाही. ती भारतमातेच्या सुपुत्रांनी गाळलेला घाम आणि रक्तातून निर्माण झाली आहे. त्याची सुरक्षा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकासाची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारचीच आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. 

अशा सर्वच इमारती पाडा
देशातील ज्या इमारती गुलामीचे प्रतीक आहेत असे राष्ट्रपती भवन, संसद भवन, कुतुबमिनार, लाल किल्ला आणि ताजमहाल पाडायला हव्यात, अशा शब्दांत सपा नेते आझम खान यांनी टीका केली.
बातम्या आणखी आहेत...