आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नैराश्यावर मात करण्यासाठी चर्चा करा’, मानसोपचारतज्ज्ञांची संख्या 4000 पेक्षाही कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
कोलकाता  - नैराश्य हा प्रमुख जागतिक आजारांपैकी एक असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नैराश्य आणि त्याच्याशी संबंधित आजारांशी लढा देण्यासाठी भक्कम मानवी हक्क धोरणे तसेच मानसिक आरोग्य संवर्धन यांची गरज आहे यावर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भर दिला आहे. ‘डब्ल्यूएचओ’ ने शुक्रवारी जागतिक आरोग्य दिन साजरा केला. त्याची मध्यवर्ती संकल्पना ‘नैराश्य : चला बोलूया’ ही होती.  

‘डब्ल्यूएचओ’चे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बेकेडॅम म्हणाले की, ज्यांच्यावर आपला विश्वास आहे अशा लोकांशी बोलल्यास निराशा कमी होण्यास मदत होते आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीचे हे पहिले पाऊल आहे. मित्र आणि कुटुंबीयांना आपली समस्या सांगणे आणि त्यांची मदत मागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैराश्यासोबत येणारा कलंक पुसण्यासाठी भक्कम मानवी हक्क धोरणे आवश्यक आहेत. मानसिक आरोग्य खबरदारी विधेयक २०१६ हे त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.   नैराश्यावर मात करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि काम करत असलेल्या ठिकाणी जागरूकता सत्रे आयोजित करणे गरजेचे आहे, तरुणांचे आयुष्य मार्गी लावण्यासाठी ही पावले उपयुक्त ठरतील. शिक्षक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणारे युवक यात परिणामकारक भूमिका बजावू शकतात. त्याशिवाय शारीरिक कसरती करणारी सत्रे, क्रीडा, योगासने अनिवार्य केली तर विद्यार्थ्यांमधील नैराश्याला प्रतिबंध करण्यास मदत मिळते.   किशोरवयीनांचा आरोग्य, ट्रॉमा केअर, तंबाखूवर नियंत्रण, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि दु:खशमन खबरदारी हे उपाय आत्महत्या रोखण्यासाठी करता येऊ शकतात.
 
मानसोपचारतज्ज्ञांची संख्या ४००० पेक्षाही कमी  
देशात ४००० पेक्षा कमी मानसोपचारतज्ज्ञ आहेत. हे प्रमाण एक लाखाला ०.३ टक्के एवढेच आहे. त्यापैकी बहुतांश जण शहरी भागात काम करतात.  उपचारातील ही तफावत भरून काढण्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे(एनएमएचपी) आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तींना नैराश्यासह सामान्य मानसिक आजारांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी प्राथमिक आरोग्य खबरदारी पातळीवर उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याचा एनएमएचपीचा विचार आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...