आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा सभापतींविरुद्ध द्रमुक आणणार अविश्वास, 18 फेब्रुवारी रोजी विश्वास प्रस्तावादरम्यान भेदभाव झाल्याचा केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडू विधानसभा सभापतींविरुद्ध डीएमके अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. पक्षाने विधानसभा सचिवांना याविषयी पत्र पाठवले. पक्षाने १८ फेब्रुवारी रोजी नवे मुख्यमंत्री पलानीस्वामींवर विश्वास प्रस्ताव सादर करण्यादरम्यान सभापती पी.धनपाल यांच्यावर भेदभाव केल्याचा आरोप केला.  
 
डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते एम.के. स्टॅलिन यांनी सोमवारी सांगितले होते की, त्यांचा पक्ष सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. मंगळवारी पक्षाच्या वतीने विधानसभा सचिव ए.एम.पी. जमालुद्दीन यांना याविषयी पत्र पाठवण्यात आले. याची एक प्रत सभापतींना पाठवली. नियमानुसार सदनात १५ दिवसांच्या आत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणे अपेक्षित असते.  तामिळनाडू विधानसभेत २३४ सदस्यांपैकी ८९ सदस्य डीएमकेचे आहेत.  

 
बातम्या आणखी आहेत...