आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडून मुंबई मनपाच्या जकात कराची भरपाई! अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची तीनदिवसीय बैठक सुरू झाली. बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे अर्थमंत्री मनीष शिसोदिया यांनी असे हस्तांदोलन केले. - Divya Marathi
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची तीनदिवसीय बैठक सुरू झाली. बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे अर्थमंत्री मनीष शिसोदिया यांनी असे हस्तांदोलन केले.
नवी दिल्ली - मुंबई महानगरपालिकेद्वारे आकारण्यात येणाऱ्या जकात कराची भरपाई केंद्र शासन देणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेत वस्तू व सेवा कर परिषदेची तीनदिवसीय बैठक आज सुरू झाली. या बैठकीत देशातील सर्व राज्यांचे वित्तमंत्री, वस्तू व सेवा कर परिषदेचे सदस्य, विविध राज्यांतील वित्त विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या वतीने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन उपस्थित होते. या बैठकीत मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात अाला. वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे सर्वच स्थानिक कर रद्द होतील. १ एप्रिल २०१७ पासून एकच कर प्रणाली देश पातळीवर लागू होणार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतून सर्वाधिक कर गोळा हाेत असल्याने राज्य सरकारतर्फे मुंबई महानगरपालिकेद्वारे आकारल्या जाणाऱ्या जकात कराची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होती. आज ही मागणी मान्य झाल्यामुळे राज्य शासनावर पडणारे आर्थिक अाेझे माेठ्या प्रमाणात कमी होणार असल्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. याशिवाय आजच्या बैठकीत राज्यांच्या वार्षिक उत्पन्नावर पाच वर्षांपर्यंत १४ टक्के नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...